22 Pilgrims Died By Heat Stroke In Saudi Arabia Saam Tv
देश विदेश

Hajj Yatra 2024: मक्कामध्ये उष्णतेची तीव्र लाट, उष्माघाताने २२ हज यात्रेकरूंचा मृत्यू; सौदी सरकार वादाच्या भोवऱ्यात

Priya More

सौदी अरेबियामध्ये (saudi arabia) उष्णतेची लाट (Heat Wave) पसरली आहे. यामुळे जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या धार्मिक यात्रांपैकी एक असलेल्या हज यात्रेवर परिणाम झाला आहे. हज यात्रेदरम्यान अति उष्णतेमुळे अनेक यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत उष्माघाताने (Heat Stroke) २२ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहेत. मृतांची संख्या वाढल्यामुळे सौदी अरेबिया सरकार वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहे. सध्या सौदी सरकारवर टीका केली जात आहे.

सौदी अरेबियामध्ये उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे मक्का आणि मदिना येथे आलेल्या जगभरातील २२ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर उष्माघातामुळे हजारो यात्रेकरू आजारी पडले आहेत. सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, उष्माघाताच्या २७०० हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. हज यात्रेदरम्यान उष्माघाताने मृत्यू झालेल्या यात्रेकरूंचे मृतदेह रस्त्याच्या कडेला उन्हात ठेवण्यात आल्याचे अनेक व्हिडीओ सौदी अरेबियातून समोर आले आहेत. या प्रकरणावरून आता सौदी अरेबिया सरकारवर टीका होत आहे. यावेळी भारतातून १ लाख ७५ हजार यात्रेकरू पवित्र हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले आहेत.

यावर्षी जगभरातील जवळपास १८ लाख लोकं हज यात्रेसाठी मक्का आणि मदिना येथे पोहोचले आहेत. सौदी सरकारने प्रवाशांसाठी योग्य व्यवस्था केली नसल्यामुळे त्यांना उष्णतेसोबतच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा दावा मक्का आणि मदिना येथे जाणाऱ्या लोकांकडून करण्यात येत आहे. हज यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंचा उष्णाघाताने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मृतांच्या वाढत्या संख्येनंतर हज यात्रेच्या तयारीबाबत सौदी अरेबिया सरकारचे दावे उघड झाले आहेत. त्यामुळे आता सरकारवर जगभरातून टीका होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अनेक मृतदेह रस्त्याच्या दुभाजकावर आणि फूटपाथवर ठेवलेले दिसत आहेत. इजिप्शियन यात्रेकरू अजा हमीद ब्राहिम यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, त्याला रस्त्याच्या कडेला मृतदेह पडलेले दिसले. मोठ्या संख्येने होणारे मृत्यू आणि त्यानंतर मृतदेहांची दुरावस्था यावरून लोक सोशल मीडियावर सौदी अरेबियावर टीका करत आहेत. तर ताहा सिद्दीकी यांनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या मृतदेहांचा व्हिडीओ शेअर करताना विचारले की, 'यासाठी सौदी सरकार जबाबदार असेल का? ते इस्लामिक पर्यटनाला प्रोत्साहन देतात आणि त्यातून कोट्यवधींची कमाई करतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओनंतर आता सौदी सरकारवर जगभरातून लोकं टीका करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Durga Ashtami 2024 : नवरात्रीत अष्टमीला बनतोय महासंयोग; 'या' ४ राशी बनणार गडगंज श्रीमंत

Upcoming Marathi Movie 2024: ऑक्टोबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचा गाजावाजा, कोणता चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?

SCROLL FOR NEXT