Karnataka News: कर्नाटकात भाजप नेत्याचा पेट्रोल-डिझेलच्या दराविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू, कार्यकर्त्यांवर शोककळा

BJP leader dies during protest : कर्नाटकात भाजप नेत्याचा पेट्रोल-डिझेलच्या दराविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भाजप नेते भानुप्रकाश यांच्या मृत्यूने कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.
कर्नाटकात भाजप नेत्याचा पेट्रोल-डिझेलच्या दराविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू, कार्यकर्त्यांवर शोककळा
BJP saam tv

कर्नाटक : कर्नाटकात पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करताना भाजप नेत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एमबी भानुप्रकाश असे त्यांचे नाव आहे. ते ६९ वर्षांचे होते. कर्नाटकातील शिवमोगा भागात आंदोलन करत होते. भानुप्रकाश हे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जमिनीवर कोसळले.

कर्नाटक सरकारच्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर वाढवण्यात आलेल्या कराविरोधात भाजपने आंदोलन पुकारलं होतं. भाजपने १५ जूनला राज्यभरात आंदोलन पुकारलं होतं. कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल ३ रुपये तर डिझेलमध्ये ३.०५ रुपयांनी वाढ झाली आहे.

कर्नाटकात भाजप नेत्याचा पेट्रोल-डिझेलच्या दराविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू, कार्यकर्त्यांवर शोककळा
VIDEO: 'लोकसभा निकालात मोठी डील, निवडणूकीत आदर्श घोटाळा', संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून कर्नाटकातील शिवमोगा या भागात पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन आयोजित केलं होतं. याच आंदोलनात भानुप्रकाश कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जमिनिवरच कोसळले. त्यानंतर त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी भानुप्रकाश यांना मृत घोषित केले.

कर्नाटकातील भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी म्हटलं की, पक्षासाठी त्यांनी भरपूर काम केलं'. भानुप्रकाश यांच्या निधनाने कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.

कर्नाटकात भाजप नेत्याचा पेट्रोल-डिझेलच्या दराविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू, कार्यकर्त्यांवर शोककळा
Manoj Jarange News : मनोज जरांगे यांच्या निधनाची खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली; तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा

दरम्यान, कर्नाटकातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी १५ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली होती. पेट्रोल आणि डिझेलवरील वाढीव दर मागे घेण्यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. दरम्यान, कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी म्हटलं की, महाराष्ट्र आणि गुजरातच्या तुलनेत कर्नाटकात इंधानाचे दर कमी आहेत'.

कोण होते भाजप नेते भानुप्रकाश?

६९ वर्षीय एमबी भानुप्रकाश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. तसेच ते भाजपचे वरिष्ठ नेते होते. भाजपच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. तसेच ते विधानपरिषदेचे आमदारही होते. त्यांनी कर्नाटकातील भाजप उपाध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com