Panjab/Congress Saam TV
देश विदेश

सिद्धूला निलंबीत केलं असतं तर पंजाबमध्ये काँग्रेसचे हाल झाले नसते; KRK ने केलं ट्विट

'प्रिय राहुल गांधी, प्रियंका गांधी जर तुम्ही वेळीच सिद्धूला निलंबीत केलं असतं तर...'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज जाहीर झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला आहे. आधी भाजपची सत्ता होती त्या राज्यात भाजप पराभूत झालं आहेच मात्र पंजाबमध्ये (Panjab) सत्तेत असलेल्या काँग्रेसला देखील कालच्या आप पक्षाने पराभूत केल्याने का्ँग्रेसच्या वरिष्ठांवरती टीका सुरु झाली आहे. पंजाबमध्ये अंतर्गत कलहामुळे काँग्रेसने सत्ता तर गमावलीच मात्र नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी देखील पराभूत झाले आहेत.

दरम्यान, पंजाबमध्ये (Panjab) सत्तेत असलेल्या राज्यातून काँग्रेसच्या हातातून सत्ता गेल्याने अभिनेता कमाल आर खानने (KKR) एक ट्विट करत राहुल गांधी, प्रियंका गांधी नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर निशाणा साधलाय. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो ' प्रिय राहुल गांधी, प्रियंका गांधी जर तुम्ही वेळीच सिद्धूला निलंबीत केलं असतं. तर आज पंजाबमध्ये तुमची ही परिस्थिती नसते. तुम्ही २ बोटींवर एकाचवेळी पाय ठेवून होतात. ते कायम धोकादायकच असते', असे ट्विट त्याने केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT