Zomato Delivery Saam Tv
देश विदेश

Zomato: कसं शक्य आहे? ५०० किमी अंतरावरून मागवलेले कबाब अवघ्या 30 मिनिटांत पोहोचले, Zomatoविरूद्ध ग्राहकाची न्यायालयात धाव

Rohini Gudaghe

Zomato Customer Complaint

लखनऊमध्ये तयार केलेले कबाब ५०० किलोमीटर दूर ३० मिनिटांत गुरुग्राममध्ये पोहोचले. झोमॅटोवरून कबाब ऑर्डर करणाऱ्या ग्राहकाला ही गोष्ट संशयास्पद वाटली. त्यामुळे ग्राहकाने झोमॅटो कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुग्रामच्या सौरव मॉल नावाच्या व्यक्तीने लखनौहून कबाब मागवले (Zomato Delivery) होते. त्याने ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांनी ताजे कबाब त्याच्या घरी पोहोचले.  (Latest Marathi News)

यानंतर त्यांनी झोमॅटो विरोधात कायदेशीर खटला दाखल केला आहे. झोमॅटोने (Zomato) दावा केला आहे की, ती देशातील अनेक भागांतील नामांकित रेस्टॉरंटमधून गरम आणि ताजे अन्न पुरवते. सौरवच्या याचिकेवर साकेतच्या स्थानिक न्यायालयाने मागील महिन्यात झोमॅटोला समन्स बजावले होते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप

सौरवने झोमॅटो लीजेंड्स नावाच्या कंपनीकडून चार डिश ऑर्डर केल्या होत्या. यातील तीन पदार्थ दिल्लीतील, तर एक लखनऊ येथील होते. जामा मशिदीतून 'चिकन कबाब रोल', कैलाश कॉलनीतून 'ट्रिपल चॉकलेट चीज केक', जंगपुराहून 'व्हेज सँडविच' आणि लखनऊहून 'गलोटी कबाब' मागवण्यात आले होते.

सौरवच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं की, लखनऊ ते गुरुग्रामपर्यंत ताजे कबाब ३० मिनिटांत पोहोचवणं शक्य (Zomato Customer Complaint) नाही. हे झोमॅटोच्या काही गोदामात ठेवण्यात आले होते. याशिवाय झोमॅटो पॅकिंगमध्ये कबाब आले. याशिवाय दिल्लीतील सर्व रेस्टॉरंट्स जिथून मॉलने ऑर्डर दिली होती, ती त्याच्या घरापासून ३० किलोमीटर अंतरावर होती. ट्रॅफिक नसेल तरीही गुरुग्रामपासून या ठिकाणी जाण्यासाठी एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो.

कंपनीचा दावा

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार सौरवच्या वकिलांनी सांगितलं की, कंपनीकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. 2022 मध्ये Zomato ने त्यांच्या ब्लॉगवर दावा केला आहे की, 'Legends' ऑर्डर दुसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत (Zomato News) पोहोचतील. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, झोमॅटो रेस्टॉरंट भागीदार आणि डिलिव्हरी भागीदारांच्या मोठ्या नेटवर्कचा फायदा घेऊन, खाद्य तंत्रज्ञान आणि ग्राहकांना काय आवडते, याबद्दल सखोल माहिती घेऊन, भारतभरातील आयकॉनिक डिशेस दुसऱ्याच दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT