Pune Crime News: पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना हिसका; झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला लुटणाऱ्या ५ जणांविरोधात मोठी कारवाई

Pune Crime News: विश्रांतवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या विक्रांत उर्फ सरडा देवकुळे व त्याच्या इतर ५ साथीदारावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Pune Police
Pune Police Saamtv
Published On

सचिन जाधव

pune Crime News: पुण्यातील गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. पुण्यात झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला शस्त्राचा धाक दाखवून पैसे लुटण्याचा प्रकार झाला होता. तसेच परिसरातील दुचाकी व तीनचाकी गाड्यावर धारदार शस्त्राने तोडफोड केली होती. विश्रांतवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या विक्रांत उर्फ सरडा देवकुळे व त्याच्या इतर ५ साथीदारावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ४१ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. टोळी प्रमुख विक्रांत उर्फ सरडा प्रकाश देवकुळे,कुणाल उर्फ साहील बाबु पेरुमलट, रोहीत शैलेश सदाकळे,गणेश बाबु बावधने,आदित्य भारती शेडगे,तेजस उर्प बलमा अर्जुन गायकवाड यांना अटक करण्यात आहे. तसेच त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

Pune Police
Jalna Crime News : अनैतिक संबंधातून मूल झाल्याचा संशय; सासू, पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेची टोकाचे पाऊल

या आरोपींवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १७ जुलै रोजी विश्रांतवाडी येथील चव्हाण चाळ जवळ घडला होता. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना विक्रांत उर्फ सरडा देवकुळे याने नव्याने टोळी तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील चार वर्षापासून गुन्हे करत आहे.

Pune Police
Mumbai Crime News: क्षुल्लक वादातून सख्ख्या भावांवर तलवारीने हल्ला, एकाचा जागीच मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

या टोळीवर विनापरवाना शस्त्र बाळगणे, हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत,बेकायदेशीर जमाव जमवणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत निर्माण करणे, पोलीस कायदा व सुव्यवस्थेच्या आदेशाचा भंग करणे तसेच विश्रांतवाडी भागात आपले टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी व दहशत राहावी यासाठी गंभीर गुन्हे केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com