Udyog Vihar Police Sation Gurugram Saam Tv
देश विदेश

Bhojpuri Actress News: भोजपुरी अभिनेत्रीवर अत्याचार; हॉटेलवर मुलाखतीसाठी बोलावून केलं भयानक कृत्य

Gurugram Police: या प्रकरणी उद्योग विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

Delhi News: भोजपुरी अभिनेत्रीवर (Bhojpuri Actress) अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीनजीकच्या गुरुग्राममध्ये ही घटना घडली आहे. मुलाखतीच्या बहाण्याने अभिनेत्रीला गुरुग्राममधील (Gurugram) एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते. त्याचठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवरील फ्रेंडनेच हे लज्जास्पद कृत्य केले आहे. 20 जुलै रोजी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिचे इन्स्टाग्रामवर महेश पांडे नावाच्या एका व्यक्तीशी बोलणं झालं होतं. भोजपुरी चित्रपटामध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने तिला गुरुग्राममधील हॉटेलमध्ये बोलावले. सांगितल्याप्रमाणे ती त्या हॉटेलवर पोहचली आणि त्यावेळी ही घटना घडली

अभिनेत्रीने पोलिसांना पुढे सांगितले की, ती दिल्लीत राहते आणि 29 जून रोजी गुरुग्रामच्या उद्योग विहार भागातील एका हॉटेलमध्ये तिला बोलावले होते. हॉटेलमधली रूम आधीच बुक केलेली होती. तिथे गेल्यावर तिला मुलाखतीच्या नावाखाली काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र नंतर समोरच्या व्यक्तीने दारू पिऊन तिच्यावर अत्याचार केला.

अत्याचार केल्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच त्याने आपल्या मित्राच्या मार्फत फोन करुन धमकावले होते. इतकंच नाही तर तिचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धकमी देण्यात आली असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. या प्रकरणी गुरुग्राम येथील उद्योग विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 'याप्रकरणाचा कसून तपास सुरु असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT