Crime News Saam tv
देश विदेश

१००० रूपयांसाठी वाद, कॉल गर्लचा दोघांनी जीव घेतला, बॅगमध्ये मृतदेह भरला अन्...

Crime News : १००० रूपयांवरून वाद झाल्याने गुरुग्राममध्ये कॉल गर्लची हत्या करण्यात आली. मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून फरीदाबाद रस्त्यावर फेकण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

१००० रूपयांसाठी झालेल्या वादातून दोन जणांनी कॉल गर्लची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन तरूणांनी सिकंदरपूरमध्ये कॉल गर्लला आपल्या रूममध्ये बोलवले होते. एक हजार रूपयांवरून त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात तरूणांनी तिची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून बॅगमध्ये भरले. त्यानंतर हत्या लपवण्यासाठी फरीदाबाद रोडवर बॅग फेकली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

गुरुग्राममधील सुशांत लोक परिसरात फरीदाबाद रस्त्यावर दोन मे रोजी ट्रॉली बॅगमध्ये ३३ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकराणानंतर एकच खळबळ उडाली होती. या हत्येचा गुरुग्राम पोलिसांनी पर्दाफाश केला. मृत महिलेची ओळख पार्विन उर्फ रिया अशी झाली, ती मूळ पश्चिम बंगालच्या पार्क सर्कस येथील राहणारी आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपी, दिनेश कुमार (22, मूळ उत्तर प्रदेश, रामपूर) आणि बिप्लव बिस्वास (26, मूळ उत्तराखंड, उधमसिंग नगर) यांना सिकंदरपूर येथून अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, दोन मे च्या रात्री दिनेशने पार्विनला सिकंदरपूर मेट्रो स्टेशनवरून घरी नेले. तिथे दोघांनी एकत्र मद्यपान केले. पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. त्यानंतर दिनेशने पार्विनचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर बिप्लवच्या मदतीने त्याने मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये कोंबला अन् सेक्टर 44 च्या रस्त्यावर फेकला. दुसऱ्या दिवशी हा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली.

गुरूग्राम पोलिसांना सुरुवातीला या प्रकरणात कोणताही पुरावा मिळाला नाही. कारण घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पण सिकंदरपूर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पुरावा मिळाला. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना शोधून काढले. पार्विनच्या डाव्या अंगठ्यावरील ८ टॅटू आणि इतर वैशिष्ट्यांमुळे तिची ओळख पटली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वांद्रे येथे अतिक्रमण, स्थानिकांची दगडफेक

मुंबईच्या वांद्रे भागात संघर्ष पेटला; अतिक्रमण कारवाईविरोधात स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक

Mumbai- Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, भरधाव कारमध्ये लोखंडी रेलिंग घुसली; दोघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय भूकंप होणार? अजित पवार गटातील 22 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; २० वर्षीय भारतीय जवानाचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT