छत्तीसगड सीमेवर पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक, 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश Saam Tv
देश विदेश

छत्तीसगड सीमेवर पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक, 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

सुकमा जिल्ह्यामधील तेलंगणा- छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : सुकमा जिल्ह्यामधील तेलंगणा- छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक (Encounter) झाली आहे. या चकमकीमध्ये पोलीस दलाने अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. शिवाय घटनास्थळावर अनेक हत्यारे देखील जप्त करण्यात आले आहे. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये काही महिला देखील यामध्ये आहेत.

तेलंगणाच्या (Telangana) कोत्तागुडम (Kottagudam) येथील एसपी सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पाडण्यात आली आहे. घटनास्थळी अद्याप शोधमोहीम सुरू आहे. यावेळी एसपी सुनील दत्त यांनी दिलेल्या माहितीनुसार की, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सीमावर्ती भागात किस्ताराम पीएसच्या (Kistaram P.S.) जंगल परिसरामध्ये ही चकमक घडली आहे. या चकमकीमध्ये आतापर्यंत ६ नक्षलवाद्यांना (Naxals) ठार करण्यात आले आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

एसपी सुनील दत्त यांनी दिलेल्या माहितीनुसार की, हे ऑपरेशन तेलंगणा पोलीस (Police), छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफच्या (CRPF) जवानांनी संयुक्तपणे राबवले आहे. आठवडा अगोदरच छत्तीसगड मधील दंतेवाडा (Dantewada) जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली होती. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी २ महिला नक्षलवाद्यांना ठार केले होते. या महिला नक्षलवाद्यांवर ६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

गुप्त माहितीच्या आधारे अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोंडेरास गावच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू झाली. दंतेवाडा जिल्ह्याचे एसपी अभिषेक पल्लव यांनी देखील या चकमकीला दुजोरा दिला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार की, सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीमध्ये मलांगेर क्षेत्र समितीचे सदस्य हिडमे कोहरामे आणि चेतना नाट्य मंडळाचे प्रभारी पोज्जा यांना ठार केले आहे. नक्षलवादी कोहरामे याच्यावर देखील ५ लाख रुपये तर पोज्जा याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

Ladki Bahin Yojana : बोगस लाडकींचा सरकारला 162 कोटींचा चुना, 90 हजार अपात्र लाभार्थ्यांकडून वर्षभर लाभ

Maharashtra Rain Live News: पुणे नाशिक महामार्गावर ५ किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा

Mumbai Crime: बायकोसोबत एकांत मिळेना, बापाने मुलीलाच संपवलं; मुंबई हादरली

SCROLL FOR NEXT