देणगीसाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनावर संजय राऊतांचं टीकाशस्त्र

शिवसनेचे खासदार संजय राऊतयांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना चांगलाच टोला लगावला
देणगीसाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनावर संजय राऊतांचं टीकाशस्त्र
देणगीसाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनावर संजय राऊतांचं टीकाशस्त्र - Saam Tv

नवी दिल्ली : शिवसनेचे खासदार संजय राऊत (Snjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना चांगलाच टोला लगावला आहे. त्यांनी १२ आमदारांच्या शिफारसीवर होत असलेल्या विलंबावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत असताना राज्यपालांवर टीका केली आहे.

त्यांनी 'महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) हे फारच अभ्यासू व्यक्ती आहेत. इतका अभ्यास बरा नव्हे असे स्पष्ट बोले आहेत. राज्य सरकारने (State Government) राज्यपालांना केलेल्या शिफारसी त्यांनी मान्य करायच्या असतात. आमच्या १२ आमदारांची (MLA) नियुक्ती करणे त्यांना बंधनकारक आहे. लोकशाहीमध्ये इतका अभ्यास बरा नाही. तुम्हाला त्वरित निर्णय घ्यायचा असतो, असे म्हणत राज्याचे राज्यपालांकडे (Governor) असलेल्या महत्वाचे प्रलंबित निर्णय त्यांनी त्वरित घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

याचबरोबर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर भाजपसाठी (BJP) निधी मागण्यावरुन टीका केली आहे. ते म्हणाले की, 'भारत शेतकऱ्यांमुळे (farmers), कष्टकऱ्यांमुळे आणि उद्योजकांमुळे बलाढ्य झाला आहे. मात्र, आम्हाला आताच नव्याने समजले आहे की भाजपला देणग्या दिल्याने देश बलाढ्य होत आहे. यामुळे देशात गोंधळ निर्माण झाला आहे. देणग्या आम्हालाच द्या दुसऱ्याला देऊ नका असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला आहे.

देणगीसाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनावर संजय राऊतांचं टीकाशस्त्र
धक्कादायक! बायकोने नवऱ्याला गावातील अल्पवयीन मुलीवर करायला लावला बलात्कार

देशातील लोकांकडून देणग्या घेणे हा बहाणा आहे. हा देशातील उद्योगपतींना स्पष्ट संदेश आहे की देणग्या आम्हालाच द्या. दुसऱ्याला दिल्या तर आमचे त्यावर लक्ष राहणार आहे. भाजपच्या बँक (Bank) खात्यामध्ये शेकडो कोटी जमा झाले आहेत. संजय राऊत (Snjay Raut) पुढे म्हणाले की, 'पक्षाला देणगी देण्यात कोणाची हरकत नाही. परंतु, देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पक्षाकरिता निधी मागणे योग्य नाही. याच्यावर आक्षेप घेतला जाऊ शकणार आहे. मी घेत नाही मात्र आक्षेप घेतला जाऊ शकतो. हे पंतप्रधानांचे काम नव्हे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com