Facebook Friendship Turns Nightmare Saam Tv
देश विदेश

अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवलं; शरीरसंबंध, VIDEO शूट अन् पैशांची मागणी, 'असं' उघडं पडलं महिलेचं पितळ

Facebook Friendship Turns Nightmare: जुनागढमधील निवृत्त वन अधिकाऱ्याला महिलेनं फसवलं. व्हिडिओ शूट करून ४० लाख रूपयांची मागणी.

Bhagyashree Kamble

  • महिलेनं निवृत्त वन अधिकाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.

  • नंतर व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल.

  • ४० लाख रूपयांची मागणी.

  • पोलीस तपासात सत्य उघड.

गुजरातमधील जुनागढमधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. निवृत्त वन अधिकाऱ्याला एका महिलेनं फसवून ४० लाख रूपये उकळण्याचा प्रयत्न केला. गोड बोलणं, विश्वास आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महिलेनं निवृत्त वन अधिकाऱ्याला फसवलं. या प्रकरणी अधिकाऱ्यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

निवृत्त वन अधिकारी हे जुनागढमधील चोबारी रोडवर वास्तव्यास आहेत. हे अधिकारी २०१७ साली सेवेतून निवृत्त झाले. काही महिन्यांपूर्वी त्याला फेसबुकवर उर्मिला नावाच्या एका महिलेची रिक्वेस्ट आली होती. तिनं स्वत: ला अविवाहित असल्याचं सांगितलं. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. त्यांच्यात जवळीक वाढली.

काही दिवसानंतर दोघे एका हॉटेलमध्ये भेटले. त्यांच्यातील जवळीक वाढली. उर्मिलानं हॉटेलमधील सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. काही दिवसानंतर उर्मिलानं निवृत्त वन अधिकारी यांना फोन केला. तसेच गर्भवती असल्याचं सांगितलं. गर्भपातासाठी पैशांची आवश्यकता असल्याचं तिनं सांगितलं. ती वारंवार पैशांची मागणी करू लागली.

निवृत्त वन अधिकारी यांनी तिला वारंवार पैसे पाठवले. १९सप्टेंबर २०२५ रोजी उर्मिलाने पुन्हा त्यांना चोटिला येथील हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तिनं त्यावेळेसही व्हिडिओ शूट केला. नंतर निवृत्त वन अधिकारी यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्यानं अधिकाऱ्याला प्रायव्हेट व्हिडिओ असल्याचं सांगत ४० लाख रूपयांची मागणी केली. तसेच महिला देखील गर्भपाताच्या नावाखाली वारंवार पैसे मागत राहिली.

तेव्हा अधिकारी यांना संशय येऊ लागला. त्यानं पोलिसांकडे धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. महिलेनं निवृत्त वन अधिकाऱ्यासोबतचे खासगी क्षण रेकॉर्ड केले. नंतर मित्राला पाठवले. या व्हिडिओवरून तीन जण निवृत्त वन अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करीत होते. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वास्तूचे हे उपाय करा; दिवाळीत पडेल पैशांचा पाऊस

Bhaji Recipe: भजी जास्त तेलकट होतायत? ट्राय करा ही सोपी रेसिपी

Maharashtra Politics: भाजपचा शरद पवार आणि काँग्रेसला दणका; आमदाराच्या मुलासह बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Amboli Tourism : 'आंबोली'ला गेल्यावर काय काय पाहाल? पटकन नोट करा सुंदर ठिकाणांची नावे

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणीला दिवाळीचा हप्ता कधी येणार?

SCROLL FOR NEXT