gujrat news
gujrat news  ani
देश विदेश

गुजरातमध्ये मोरबी पूल दुर्घनेत 132 जणांचा मृत्यू जणांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Vishal Gangurde

Gujrat News : गुजरातमधून मोठं वृत्त समोर आलं आहे. गुजरातच्या मोरबी येथे रविवारी सांयकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. मच्छु नदीवरील केबल ब्रिज कोसळला आहे. या दुर्घटनेत 132 लोकांच्या मृत्यू झाला आहे. बचाव कार्याच्या पथकाकडून आणि अधिकाऱ्यांकडून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मोसबी येथे मच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत पूलावरील अनेक जण नदीत पडले. या दुर्घटनेत अनेक जण नदीत वाहून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सूरू केले. या दुर्घटनेत आतापर्यंत ७७ जणांचा मृत्यू झाला आहे.

सदर अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे ४०० ते ५०० जण उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. सदर जूना असून काही दिवसांपूर्वीच या केबल ब्रिजची दुरुस्ती करण्यात आली होती. सदर पुलाचे तीन दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे हा पूल काही दिवसापूर्वीच खुला करण्यात आला होता. उद्घाटन झाल्यानंतर हा पूल कोसळल्यानं अनेक प्रश्नचिन्ह करण्यात येत आहे.

दरम्यान, या दु्र्घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संवाद साधला. त्यांनी तात्काळ बचाव कार्यासाठी पथकांचे सहकार्य घेण्यास सांगितले आहे. तसेच मोदी यांनी बारकाईने लक्ष देण्यास सांगितले आहे. या दुर्घटनेतील लोकांना सर्व प्रकारचं सहकार्य करण्यास सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arshad Khan: हार्दिक पंड्याला आणखी एक पर्यायी ऑलराउंडर सापडला? कोण आहे अरशद खान?

Today's Marathi News Live : शरद पवार नाशिकला पोहोचले, हेलीकॉप्टरने आगमन

IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

Weight Loss Tips: खाण्यापिण्याच्या 'या' सवयी पाळा, आठवडाभरात वजन होईल कमी

Char Dham Yatra 2024: चारधामला जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॉफिक जाम; ६ भाविकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT