Garba News Gujrat Saam TV
देश विदेश

Gujrat News: सावधान! गरबा खेळता खेळता श्वास थांबतोय, अवघ्या २४ तासात १० जणांचा मृत्यू; गुजरातमध्ये काय घडलं?

Gujrat Navratrotsav News: गुजरातमध्ये गरबा खेळताना २४ तासात १० जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

Gujrat Navratrotsav 2023:

देशात सर्वत्र नवरात्रीची धामधुम पाहायला मिळत आहे. नवरात्र म्हणलं की दांड्या अन् गरबांचा खेळ आलाच. यामध्ये तरुण- तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतो. एकीकडे युवा वर्ग गरब्याच्या रंगात रंगलेला असतानाच गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये गरबा खेळताना २४ तासात १० जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? जाणून घ्या सविस्तर.

देशभरात सध्या नवरात्रीचा  (Navratri Utsav 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात हार्ट अटॅकने २४ तासात १० जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अलिकडेच गुजरातच्या कपडवंज भागात गरबा खेळताना वीर शाह या 17 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला.

शारिरिकदृष्ट्या तो एकदम तंदुरूस्त होता. मात्र कपडवंज मधल्या गरबा ग्राऊंडमध्ये अचानक दांडिया खेळता खेळता वीरला हार्ट अटॅक आला. स्थानिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

धक्कादायक बाब म्हणजे गरबा खेळताना तरुण मुलांना हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याचे प्रमाण वाढले आहे. गुजरातमध्ये गेल्या २४ तासात गरबा खेळताना हार्ट अटॅक येवून १० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण मुलांचा समावेश आहे. मागील सहा दिवसात 108 आपत्कालीन रुग्णवाहिकेसाठी 521 कॉल हे हृदयाशी संबंधित समस्या आणि श्वासोच्छवासाच्या त्रास होत असल्याने आल्याचेही सांगण्यात आले आहे.

वीर शाहच्या मृत्यूपूर्वी अहमदाबादमधील २४ वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना पडून अचानक मृत्यू झाला. तसेच बडोद्यातील दाभोई येथे १३ वर्षीय बालकाचा, कपडवंज येथील 17 वर्षीय सगीरचा आणि बडोद्यातील एक ५५ वर्षीय व्यक्तीचा गरबा खेळताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहेत हार्ट अटॅकची कारणे? (Reasons Of Heart Attack in Youngsters)

कमी पाणी पिणे, मिठाचा अतिप्रमाणात वापर, ब्लड प्रेशर, अपुरी झोप ही हार्ट अटॅकची कारणे आहेत. तसेच गरबा खेळण्यासाठी मोकळ्या मैदानांचा वापर करावा , मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्राथमिक उपचारांचं प्रशिक्षण, कार्यक्रमाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा असावा असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

SCROLL FOR NEXT