Six-Year-Old Girl Brutally Assaulted Saam Tv News
देश विदेश

शेतातून उचललं, चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, ओरडताच गुप्तांगात रॉड घुसवला; पीडिता रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध

Six-Year-Old Girl Brutally Assaulted: ३५ वर्षीय नराधमाकडून ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न. काही तासांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Bhagyashree Kamble

गुजरातच्या जसदन येथील आटकोट परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दाहोद जिल्ह्यातील एका शेतमजूर कुटुंबातील सहा वर्षांच्या मुलीवर एका पुरूषाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बलात्कार करण्याचा त्याचा प्रयत्न फसल्यामुळे नराधमाने अतिशय क्रूर कृत्य केलं. त्यानं चिमुकलीच्या गुप्तांगात रॉड घुसवला. या घटनेनंतर चिमुकलीला उपचारासाठी राजकोटमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही संतापजनक घटना दाहोद जिल्ह्यातील आटकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात घडली. पीडित चिमुकलीचे आई वडील हे शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी पीडितेचे पालक शेतात काम करीत होते. तर, त्यांची ६ वर्षांची मुलगी तिथे खेळत होती. दरम्यान, नराधमाने पीडितेचे अपहरण केले. तसेच तिला अज्ञातस्थळी नेले.

आरोपीनं मुलीचा गळा दाबून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. चिमुकलीने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्याचा प्रयत्न फसला. त्यानं संतापून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवला. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. गुन्हा केल्यानंतर आरोपीनं तिला घटनास्थळी सोडून पळ काढला. पीडित चिमुकली रक्ताळलेल्या अवस्थेत पडून होती.

कुटुबियांनी तिचा शोध घेतला, तेव्हा ती गंभीर अवस्थेत आढळली. तिला तातडीने कुटुंबियांनी रूग्णालयात नेले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. रूग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीची प्रकृती आता स्थिर आहे. बरी झाल्यानंतर तिला २-३ दिवसांत डिस्चार्च देण्यात येईल.

या संपूर्ण प्रकाराबाबत राजकोट ग्रामीण एसपी विजय सिंह गुर्जर यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी १० पथके तयार केली होती. चिमुकलीनं मुख्य आरोपी रामसिंह तेरसिंग ड़डवेजर याची ओळख पटवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मध्यप्रदेशातील अलिराजपूरचा रहिवासी आहे. तो अटकोटमध्ये शेतमजूर म्हणूनही काम करतो. तो विवाहित असून, त्याला एक मुलगी आणि २ मुले असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Decision: फक्त ५०० रूपयांत वडिलोपार्जित जमीन नावावर, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या दोघांना तुरुंगवास ऐवजी समाजसेवा करण्याची शिक्षा

Pune Traffic: पुणेकरांसाठी गुड न्यूज! विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार, सरकारचा जबरदस्त प्लान

Ramayana-Ranbir Kapoor : रणवीर कपूरचा 'रामायण' चित्रपट अरबी भाषेतही येणार; टीझर आला समोर, पाहा VIDEO

महाराष्ट्राला मिळाली आणखी एक एक्सप्रेस, ११ ठिकाणी थांबणार, कोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

SCROLL FOR NEXT