Gujrat News: गुजरातमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. गुजरात एटीएसने पोरबंदरमध्ये दहशतवादी संघटन ISIS च्या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणात एका विदेशी नागरिकासगित चार जणांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटन ISIS च्या चार संशयितांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. चौघे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या मुसक्या आवळल्या. गुजरात एटीएस आणखी एका संशयित आरोपीचा शोध घेत आहे.
एटीएसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चौघांचा दहशतवादी संघटनेशी संबध होता. गुजरात एटीएसने शनिवारी गुजरातच्या पोरबंदरमध्ये एका विदेशी नागरिकासहित चौघांना अटक केली. एटीएसचं विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून पोरबंदर येथे सक्रिय होतं.
सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात चौघांचे संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी आहे. एटीएसने ही कारवाई डीआयजी दीपेन भद्रन यांच्या नेतृत्वात केली. भद्रन देखील अन्य अधिकाऱ्यांसोबत पोरबंदर येथे होते.
गुजरात एटीएसने यशस्वीरित्या हे ऑपरेशन पूर्ण केलं आहे. एटीएसच्या सूत्राच्या माहितीनुसार, दहशतवादी संघटनेशी संबंधित ४ जणांना अटक करण्याच्या कारवाईत डीआयडी दीपन भद्रन, एसपी सुनील जोशी, डीवायएसपी केके पटेल, डीवायएसपी शंकर चौधरीसहित अन्य अधिकारी देखील होते.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) दहशतवाद्यांशी संबंधित तीन संशयितांना अटक केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रेणने यावेळी एका दहशतवाद्याचा दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता.
राष्ट्रीय तपात यंत्रणा आणि मध्य प्रदेश एटीएसच्या मदतीने हे मॉड्यूल उध्वस्त केलं. या अभियानांतर्गत जबलपूरमधील १३ जागेवर छापा टाकला होता. या दौऱ्यादरम्यान तीन संशयितांना अटक केली. सैयद ममूर अली, मोहम्मद आदिल खान आणि मोहम्मद शाहिद असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.