Accident news Twitter/@sirajnoorani
देश विदेश

गुजरात: दोन ट्रक-कारमध्ये जोरदार धडक, ६ जणांचा होरपळून जागीच मृत्यू, पाहा Video

गुजरातमधील मोडासा येथील आलमपूरजवळ दोन ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: गुजरातमधील मोडासा येथील आलमपूरजवळ दोन ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. जोरदार धडकेनंतर कारने पेट घेतला, ज्यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर मोडासा-नडियाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. महामार्ग बंद झाल्यामुळे सध्या येथे दहा किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ५ पेक्षा जास्त लोक अजूनही वाहनांच्या आत अडकल्याचे वृत्त आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले आहे.

पाहा Video-

यासोबतच या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. आगीत तिन्ही वाहने जळताना दिसत आहेत. सध्या घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून, अग्निशमन दलाचे जवान आग विझवताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT