AHMEDABAD FIRECRACKER FACTORY FIRE KILLS 8, MASSIVE EXPLOSIONS SHAKE AREA saam tv
देश विदेश

फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; ८ जणांचा मृत्यू, स्फोटांमुळे परिसर हादरला

Ahmedabad Fireworks Factory Fire : गुजरातच्या अहमदाबादमधील महमूदपुरा भागातील असलेल्या फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली. कारखान्यात जोरदार स्फोट झाल्यानं संपू्र्ण परिसर हादरला. या घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

Bharat Jadhav

गुजरातच्या अहमदाबादमधील एका फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महमूदपुरा भागातील 'टॅलेंट फायरवर्क्स' कारखान्यात लागलेल्या आगीदरम्यान झालेल्या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला. या घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून, १५ हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज सुमारे ५ किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला.

स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की कामगारांच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. जखमींपैकी चौघांना उपचारासाठी एल.जी. (LG) रुग्णालयात आणि तिघांना असरवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

ही फॅक्टरी वस्त्राल येथील आरएएफ (RAF) कॅम्पच्या मागे आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच तिथे तैनात असलेले जवान तातडीने घटनास्थळी धावले. अग्निशमन दलाचे पथक पोहोचण्यापूर्वीच त्यांनी जखमींना आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. सध्या पाचहून अधिक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच सध्या 'कूलिंग'ची प्रक्रिया सुरू आहे.

पंतप्रधान मोदींनी घटनेवर शोक व्यक्त केली

दरम्यान या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांसाठी २ लाख रुपये आणि जखमींसाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट केली की, "गुजरातच्या अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या अपघातात जीवितहानी झाल्याची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. दुःखाच्या या कठीण प्रसंगी मी शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soybean Chilla: नाश्त्यासाठी बनवा प्रोटीनयुक्त टेस्टी सोयाबीन चीला; फक्त १५ मिनिटांत तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT