Physiotherapist Dr. Radhika Kotadia Ends Life Saam
देश विदेश

२ महिन्यांवर लग्न, डॉक्टर तरूणीनं आयुष्य संपवलं; कॅफेच्या नवव्या मजल्यावर गेली अन्...

Physiotherapist Dr. Radhika Kotadia Ends Life: सूरतमधील पॉश परिसरातील कॅफेच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून डॉक्टर तरूणीनं आत्महत्या केली.

Bhagyashree Kamble

गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका महिला डॉक्टरने उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरतच्या पॉश परिसरातील एका कॅफेच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. कॅफेमधील लोकांनी अचानक एका तरूणीला उंचीवरून पडताना पाहिले. त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, तरूणीनं आत्महत्या का केली? याचा तपास सुरू आहे.

डॉ. राधिका कोटडिया (वय वर्ष २८) असे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर तरूणीचे नाव आहे. त्या एका खासगी रूग्णालयात काम करीत होती. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राधिका या २० ते २५ मिनिटे कॅफेमध्ये एकट्याच बसल्या होत्या. नंतर रेलिंगकडे गेल्या आणि उडी मारली. कॅफेतील लोकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन, हँडबॅग आणि इतर वैयक्तिक कागदपत्रे जप्त केली. पोलीस तपासात जानेवारीमध्ये डॉ. राधिका यांचे साखरपुडा आणि नंतर लग्न निश्चित होणार होते. डॉ. राधिका यांनी अनेकदा आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत कॅफेला भेट दिली असल्याची माहिती आहे.

घटनेच्या दिवशी गुरूवारी डॉ. राधिका ८ वाजेच्या दरम्यान, कॅफेमध्ये एकटीच गेली होती. त्यानंतर त्या कुणाशी फोनवर बोलत असल्याची माहिती आहे. फोनवर बोलणं झाल्यानंतर डॉ. राधिका रेलिंग जवळ गेल्या आणि नवव्या मजल्यावरून उडी मारली. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राधिका जामनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे वडील एका डायमंड कंपनीत काम करतात. सध्या डॉ. राधिका यांनी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यापूर्वी त्या कुणाशी बोलत होत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT