गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
शंकरसिंह वाघेला यांनी मोठा निर्णय घेतला
शंकरसिंह वाघेला काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत
राहुल गांधींच्या भेटीनंतर वाघेला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत
गुजरातच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी मोठा निर्णय घेतला. ते जवळपास दशकानंतर काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. गुजरातमधून भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये परतण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. पण काँग्रेस प्रवेशाबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसचेनेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतरच घेतला जाईल अशी माहिती समोर आली आहे.
मंगळवारी 'द इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी सांगितले की, 'भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी मी काँग्रेस पक्षात सामील होण्यास तयार आहे.' त्यांनी काँग्रेसमध्ये परत येण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला, पक्षाचे गुजरात प्रभारी, गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा आणि माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोळंकी यांच्याशी आधीच चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हे देखील स्पष्टपणे सांगितले की, त्यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन फक्त राहुल गांधींना भेटल्यानंतरच होईल.
शंकरसिंह वाघेला यांनी २०१७ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला होता. आता जवळपास १० वर्षांनंतर ते काँग्रेसमध्ये घरवापसी करत आहेत. त्यांची काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबतची चर्चा पुढे सरकली आहे. पुढील महिन्यात गांधीनगर महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. तर डिसेंबर २०२७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांपूर्वीच ही मोठी राजकीय घडामोड घडत आहे.
८६ वर्षीय शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस नेतृत्वाला सांगितले आहे की, त्यांना पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नाही. उलट त्यांना पक्षासाठी योगदान द्यायचे आहे. वाघेला यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुका आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रभाव पाडण्याची शेवटची संधी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या प्रजा शक्ती डेमोक्रॅटिक पार्टीला पुनरुज्जीवित करण्यासाठी २ ऑक्टोबरपासून 'आक्रमक प्रचारमोहीम' सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.