Delhi Red Fort Car Blast Saam TV marathi
देश विदेश

Delhi Car Blast : गुजरातमध्ये विष, हरियाणात RDX अन् दिल्लीत स्फोट, डॉक्टरच्या आडून कोण डाव साधतेय?

Delhi Red Fort Car Blast : धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटाने राजधानी दिल्ली हादरली. या स्फोटामागे दहशतवादी हल्ला तर नाही ना? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. पण तीन राज्याचे कनेक्शन समोर आलेय. जाणून घेऊयात याचा एकमेंकाशी काही संबंध आहे का?

Namdeo Kumbhar

Delhi Red Fort Blast Update : ऐतिहासिक लाल किल्ल्यावर सोमवारी रात्री एका धावत्या कारमध्ये स्फोट झाला. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांकडून या हल्ल्याचा तपास करण्यात येत आहे. हा हल्ला दहशतवादी हल्ला आहे का? या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या हल्ल्याचे कनेक्शन गुजरात आणि हरियाणामध्ये आहे का? असाही तपास करण्यात येत आहे. राजधानी दिल्लीमध्ये झालेला हा हल्ला फिदायीन असू शकतो, असा संशय पोलिसांना आहे. गुजरात, हरियाणामध्ये स्फोटके आणि दिल्ली हल्ल्यामध्ये चार डॉक्टरांचा समावेश असल्याचेही समोर आलेय. (Delhi Red Fort car blast Gujarat Haryana terror network)

गुजरातमधून झाली सुरूवात -

गुजरातची राजधानी गांधीनगरमधून रविवारी एटीएसने डॉक्टर अहमद सैय्यद याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याकडे शस्त्र साठा सापडला. त्याशिवाय विष तयार करण्याची सामग्रीही मिळाली आहे. ३ हँडगन, ऑस्ट्रेलियात तयार झालेली ग्लॉक पिस्टल आणि एक इटलीची बरेटा जप्त करण्यता आली. पोलिसांनी ४ लीटर कॅस्टर ऑइलही जप्त केलेय. हे कस्ट्र ऑइल अतिशय विषारी असते. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हे विष गेल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. यापासून रायसिनही तयार करण्यात येऊ शकते. सूत्रांने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टर अहमद सैय्यद हा संवेदनशील परिसरात हल्ल्याच्या तयारीत होता.

हरियाणात मिळाले आरडीएक्स अन् स्फोटके

हरियाणामधील फरीदाबादमधून एका डॉक्टराच्या घरातून पोलिसांनी आरडीएक्स आणि स्फोटके तयार करण्याचे सामान जप्त केले. जम्मू काश्मीर पोलिसांनी ३००० किलो साहित्य जप्त केले. त्यामध्ये ३५० किलो अमोनियम नायट्रेट आणि डेटोनेटर्सचा समावेस आहे. त्यासोबतच पोलिसांना डॉक्टर मुजम्मिल शकील याच्याकडे रायफलही मिळाली.

पोस्टर लावताना आढळला शकील

आरडीएक्स पकडण्याआदी शकील याला पोलिसांनी पोस्टर्स लावताना बेड्या ठोकल्या होत्या. सहारनपूरमधून त्याला उचलण्यात आले होते. जम्मू काश्मीरमधील नौगावमध्ये जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे पोस्टर लावताना दोन जणांना अटक केली होती. यामध्ये एकजण शकील असल्याचे समोर आलेय. त्यानंतर तिसऱ्या डॉक्टर शाहीन शाहिदला अटक करण्यात आली. शाहीन शाहिदने शकीलला तिच्या कारमध्ये रायफल आणि दारूगोळा ठेवण्याची परवानगी दिली होती.

चार डॉक्टर कनेक्ट कसे झाले? -

राजधानी दिल्ली हल्ल्यात डॉक्टर उमर मोहम्मद याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. उमर हे डॉ. आदिलच्या खूप जवळचे होते, असेही समोर आलेय. हे चार डॉक्टर टेलिग्राम चॅनेलवर एकमेकांशी संवाद साधत होते.  डॉक्टर रॅडिकल डॉक्टर्स ग्रुप नावाच्या टेलिग्राम चॅनेलवर त्यांच्या दहशतवादी नेटवर्कबद्दल चर्चा करायचे. या चॅनेलवर चर्चा करणाऱ्यांमध्ये डॉक्टर आदिल अहमद, डॉ. मुझम्मिल शकील, डॉक्टर उमर आणि डॉ. शाहीन शाहिद यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर पुन्हा संतापल्या, मुक्ताईनगरमध्ये शिंदे गट आणि भाजपचा हायव्होलटेज राडा|VIDEO

Virat-Anushka: विराट आणि अनुष्काचे अनसीन रोमँटिक फोटो पाहिलेत का?

Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं

Maharashtra Nagar Parishad Live : अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील पांगरा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

SCROLL FOR NEXT