Valsad Fire News
Valsad Fire News Saam TV
देश विदेश

Valsad Fire News : वलसाडच्या सरिगाम GIDC मधील कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट; ३ जणांचा जागीच मृत्यू, २ जखमी

Satish Daud-Patil

Valsad Fire News : गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वलसाड जिल्ह्यातील सरिगाम जीआयडीसीमधील कारखान्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास बॉयरलचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात कंपनीची तीन मजली इमारत कोसळली. या भयंकर घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

याशिवाय कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून भिलाड पोलिसांच्या ताफ्यानेही घटनास्थळी धाव घेतली.

 पोलिसांनी (Police) तातडीने लोकांची गर्दी बाजूला करुन बचाव कार्य सुरू केलं.मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्याजवळच्या गुजरातच्या वलसाड तालुक्यातील सरिगाम जीआयडीसीमधील कंपनीत ही दुर्घटना घडली. कंपनीत काम सुरू असताना, सोमवारी रात्री अकरा ते बाराच्या सुमारास बॉयलरचा अचानक स्फोट झाला.

हा स्फोट एवढा भीषण होता की कंपनीची तीन मजली इमारत कोसळली. पहाटे चार वाजेपर्यंत ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. शिवाय या स्फोटाचं कारण देखील अजून अस्पष्ट आहे. बचाव कार्य अजूनही सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT