Gujarat Riots
Gujarat Riots  Saam TV
देश विदेश

Gujarat News: नरोडा पाटीया प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल; कोडनानी, बजरंगीसह सर्व आरोपींची निर्दोष सुटका

साम टिव्ही ब्युरो

Gujarat Riots : गुजरात दंगलीतील नरोडा पाटीया हत्याकांड प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नरोडा पाटीया हत्याकांडातील प्रमुख आरोपी माया कोडनानी आणि बाबू बजरंगी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अहमदाबादमधील विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. गुजरात दंगली प्रकरणातील हा अत्यंत महत्त्वाचा निकाल समजला जातो.  (Latest Marathi News)

२८ फेब्रुवारी २००२ साली गुजरातच्या अहमदाबाद शहराजवळील नरोडा येथे झालेल्या जातीय हिंसाचारात ११ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुजरातच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या माया कोडनानी, बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांच्यासह ८६ जणांवर गुन्हा दाखल केला होता.  (Breaking Marathi News)

या ८६ आरोपींपैकी आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित सर्व ६८ आरोपींची अहमदाबादच्या विशेष कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती एस. के. बक्षी यांनी आज हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. २०१० साली सुरू झालेल्या या खटल्याची सुनावणी जवळपास १३ वर्ष चालली.

सप्टेंबर २०१७ मध्ये भाजपचे वरिष्ठ नेते आणि आत्ताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यातील आरोपी माया कोडनानीच्या बचावात साक्ष देण्यासाठी कोर्टात उपस्थित राहिले होते. खटल्यादरम्यान, फिर्यादी आणि बचाव पक्षाने १८७ साक्षीदार आणि ५७ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासले. आरोपींविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट, दंगल, जातीय सलोखा बिघडवणे, दरोडा अशा गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गोध्रा घटनेच्या दुसऱ्या दिवशी झाली होती नरोडा दंगल

नरोडा येथील दंगल गोध्रा घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारीला झाली होती. या दिवशी नरोडा गावात बंदची घोषणा करण्यात आली होती. सकाळी ९ वाजेच्या सुमारास लोकांच्या जमावाने बाजारपेठ बंद करण्यास सुरुवात केली आणि हिंसाचार उसळला. जमावात सामील असलेल्या लोकांनी जाळपोळ सुरू केली, दगडफेक करून तोडफोड केली आणि यात ११ जणांचा बळी गेला होता.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उद्धव ठाकेर गेल्या १० वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? ; कोकणातून राज ठाकरेंची तोफ धडाधडली

साडीत खुललं Sonalee Kulkarni चं मनमोहक सौंदर्य; पाहा अप्सरेचे Photos

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

SCROLL FOR NEXT