Kharghar Heat Stroke: खारघरमधील १४ पैकी १२ जणांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती, शवविच्छेदन अहवाल आला समोर

Kharghar Heat Stroke: मृत्यू झालेल्या १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये १२ जणांच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Kharghar Heat Stroke News
Kharghar Heat Stroke NewsSaam TV
Published On

Kharghar Heat Stroke: खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात उष्माघातामुळे १४ जणांचा बळी गेला. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. याच दरम्यान मृत्यू झालेल्या १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये १२ जणांच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.  (Latest Marathi News)

Kharghar Heat Stroke News
Pune Rain News: पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात; सिंहगड रस्त्यावर गारपीट, नागरिकांची तारांबळ

दुर्घटनेत मृत्यू झालेल्या १४ पैकी १२ जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाल्लेलं नव्हतं, त्यांच्या पोटात अन्न नव्हतं, असं पोस्ट मॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उर्वरीत २ जणांनी काही खाल्लं होतं की नाही ते स्पष्ट होऊ शकले नाही.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे यातील काहींना आधीपासून व्याधी होत्या. ज्यामुळे वेळेवर न खाणं आणि प्रचंड ऊन याची भर पडली, आणि त्यांचा मृत्यू झाला. उन्हात बसलेल्या लोकांना पाण्यानंही काही फरक पडला नसता, त्यांना सावलीचीच गरज होती, असं पोस्ट मॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार (maharashtra bhushan) सोहळ्यात उष्माघातामुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १० महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. अजूनही ७ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी सात रुग्ण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. या १४ जणांचा मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाला, असा आरोप सातत्याने करण्यात येत होता. मात्र, शवविच्छेदन अहवाल उस्माघातानेच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.  (Breaking Marathi News)

Kharghar Heat Stroke News
Nagpur Crime News: भाचीला घरात एकटं पाहून मामाची नियत फिरली; केलं संतापजनक कृत्य, नागपुरातील घटना

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेची चौकशी होणार

दरम्यान, विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर या दुर्घटनेची लवकरच चौकशी होणार आहे. घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल, भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल. असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com