Gujarat Flood News Saam Tv
देश विदेश

Gujarat Flood Video: गुजरातमध्ये 'जल प्रलय', संपूर्ण शहर गेलं पाण्याखाली, गाड्याही गेल्या वाहून; केंद्राने पाठवली मदत...

Satish Kengar

Gujarat Flood News: गुजरातमधील नवसारी आणि जुनागडसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहमदाबाद आणि सौराष्ट्र प्रदेशासह राज्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणे आणि नद्यांमधील पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हावर वाढली आहे. त्यामुळे शहरी भागात आणि काही गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.

जुनागडमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात अनेक गाड्या आणि गुरे वाहून गेली. त्याचवेळी अहमदाबाद विमानतळावरही पाणी शिरले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संवाद साधून राज्यातील विविध भागांतील पूरसदृश परिस्थितीची माहिती घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी गुजरातच्या दक्षिणेकडील आणि सौराष्ट्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. ज्यामुळे शहरी भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि धरणे आणि नद्यांमधील पाण्याची पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढल्याने शहरांपासून अनेक गावांचे संपर्क तुटले.  (Latest Marathi News)

शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत गेल्या आठ तासांत शहरात 219 मिमी पाऊस झाला आहे. सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी लोक कंबरभर पाण्यातून चालताना दिसत होते. त्यातील काहींना पाण्याच्या जोरदार प्रवाहापासून वाचवण्यात स्वयंसेवकांनी मदत केली. नवसारी आणि जुनागड जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पावसामुळे अनेक वस्ती व बाजारपेठांमध्ये पाणी साचले होते. (Gujarat Flood Video)

प्रशासनाने लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून कोणतीही अनुचित घटना किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.

एनडीआरएफच्या पथकाने जुनागडमध्ये सुरू केलं बचावकार्य

गुजरातच्या अनेक भागांमध्ये संततधार पाऊस पडत असताना, नॅशनल डिफेन्स रिस्पॉन्स फोर्सच्या (NDRF) टीमने शनिवारी या प्रदेशातील जुनागड जिल्ह्यात बचावकार्य केले. बचावकार्यात एनडीआरएफचे जवान सामान्य लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांना शहरातील पूर आणि जलमय भागापासून सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: माजी मंत्री आमदार राजेद्र शिंगणे यांना अजित पवारांचा फोन

VIDEO : फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करण्याचं धाडस भाजपात नाही; रोहित पवारांची जोरदार टीका

Kalyan : सुट्ट्या पैशांवरुन वाद टोकाला; रागाच्या भरात प्रवाशाची महिला बुकिंग क्लार्कला बेदम मारहाण, कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटना

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा महायुती, नारायण राणेंना मोठा धक्का; राज्यातील २ दिग्गज नेत्यांनी हाती धरली मशाल, कशी असेल लढाई?

SCROLL FOR NEXT