Fire in game zone  Saam tv
देश विदेश

Fire in game zone : गुजरातच्या राजकोटमध्ये मॉलच्या गेमिंग झोनला भीषण आग, २४ जणांचा मृत्यू

Fire in game zone gujarat : गुजरातच्या राजकोटमध्ये शनिवारी टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या आगीत आणखी तरुण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Pramod Subhash Jagtap

गुजरात : गुजरातच्या राजकोटमध्ये शनिवारी टीआरपी मॉलच्या गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी मॉलला भीषण आग लागल्याची घटना घडली. रोजकोटमधील टीआरपी मॉलला लागलेल्या आगीत २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृतांमध्ये १२ लहान मुलांचा समावेश आहे.

या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुर्देवी घटनेनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली. गुजरात पोलिसांनी गेमिंग झोन मालकाला अटक केली आहे.

अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. राजकोटमधील मॉलला लागलेल्या आगीचे विविध व्हिडिओ समोर येत आहेत. या व्हिडिओमध्ये गेमिंग झोन जळून खाक होताना दिसत आहे.

स्थानिक लोकांनी सांगितले की, शाळकरी मुलांना सुटी असल्याने मोठ्या संख्येने या मॉलमध्ये लहान मुले खेळायला येतात. यादरम्यान ही दुर्देवी घटना घडली. आगीच्या घटनेवेळी लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

अहमदाबादमध्ये असणाऱ्या टीआरपी गेमिंग झोनला आग लागली. या आगीत गेमिंग झोन जळून खाक झाला आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. तसेच पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले.

अग्निशमन दलाचे अधिकारी आईवी खेर यांनी सांगितलं की, आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. बेपत्ता लोकांची कोणतीही माहिती हाती आलेली नाही. गेमिंग झोनला लागलेली आग विझविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनास्थळी हवा देखील मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आग विझविण्यास अडचणी येत आहेत'.

दरम्यान, या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना ५० हजार रुपये दिले जाणार आहे. या घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची तपासाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करत दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT