Gujarat: पोलीस स्टेशन परिसरात भीषण आग, 25 गाड्या जळून खाक Twitter
देश विदेश

Gujarat: पोलीस स्टेशन परिसरात भीषण आग, 25 गाड्या जळून खाक

या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीचे लोट पाहायला मिळाले.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - गुजरातमध्ये Gujarat पोलीस स्टेशन परिसरात भीषण आग Fire लागल्याची घटना उघडकीस आली आहे. गुजरातमधील खेडा शहरातील पोलीस स्टेशनच्या परिसरात रात्रीच्या सुमारास ही आग लागली. ही आग काल रात्रीच्या सुमारास लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण आगीत 25 वाहने Vehicles जळून खाक झाली आहेत. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग लागलेल्या वाहनांमध्ये दुचाकी, ऑटोरिक्षा, कार अशा 25 गाड्यांचा समावेश आहे. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीचे लोट पाहायला मिळाले.

या भीषण आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही क्षणातच तब्बल २५ वाहनांनी पेट घेतला आणि जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT