voting
voting Saam Tv
देश विदेश

Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये कोण मारणार बाजी? दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात

वृत्तसंस्था

Gujarat Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरात विधानसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. सकाळी ८ वाजता पासून मतदानाला सुरूवात झाली असून असून नागरिकांना संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान १ डिसेंबर रोजी पार पडले. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान पडले.

आज पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह सुद्धा अहमदाबादमध्ये मतदान करतील. गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात आज ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. भाजप,काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. यासाठी ८३३ उमेदाद्वार रिंगणात आहे. या ९३ जागांपैकी अहमदाबादमधील १६ जागा यंदा भाजपासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे बोलले जात आहे. भाजपाने १९९० पासून या जागांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने ९३ पैकी ५१जागा जिंकल्या, तर काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळवला होता. मध्य गुजरातमध्ये भाजपला 37 तर काँग्रेसला 22 जागा मिळाल्या आहेत. पण उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते आणि त्यांनी 17 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 14 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी आप सुद्धा गुजरातमध्ये निवडणूक लढवत असल्याने चुरशीची लढत होईल, असा चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.

पहिल्या टप्प्यात ६० टक्के मतदान

पहिल्या टप्प्याचे मतदान १ डिसेंबर रोजी पार पडले. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान पडले. पहिल्या टप्प्यातील मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्यात सुमारे ६० टक्के मतदान झाले होते. दरम्यान, आज गुजरातमध्ये मतदानाचा दुसरा आणि शेवटचा टप्पा असून 8 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे यंदा गुजरातमध्ये कुणाची सत्ता येणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला SSPMS ग्राउंडवर होणार सभा

SCROLL FOR NEXT