Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Akshay Kanti Bam: गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघानंतर काँग्रेसला आता मध्य प्रदेशातही मोठा धक्का बसलाय. इंदौर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अक्षय कांती बम यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय.
Akshay Kanti Bam
Akshay Kanti BamSaam Tv

Akshay Kanti Bam:

गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघानंतर काँग्रेसला आता मध्य प्रदेशातही मोठा धक्का बसलाय. इंदौर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अक्षय कांती बम यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. अक्षय बम एवढ्यावर थांबले नाहीत. तर अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेशही केलाय. भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्यानंतर याबाबतची माहिती दिली.

इंदूर काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांचं भाजपात स्वागत आहे. पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नडड्डा यांच्या नेतृत्वातल्या भाजपाचं कमळ त्यांनी हाती घेतलं त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो, असं ट्वीट करत विजयवर्गीय यांनी सेल्फी शेअर केला.

इंदूर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची तारीख 25 एप्रिल आणि मागे घेण्याची तारीख 29 एप्रिलची होती. त्याआधीच कैलाश विजय वर्गीय यांनी खास मोहीम राबवली आणि काँग्रेसच्या उमेदवारालाच पक्षात घेतलं. काही दिवसांपूर्वी सूरतमध्येही असाच प्रकार घडला होता.

सूरतमध्ये काय घडलं होतं?

भाजप उमेदवार मुकेश दलाल यांना निकालापूर्वीच बिनविरोध विजेते उमेदवार घोषित केलं. कारण त्यांचे प्रतिस्पर्धी निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला होता. आता तशीच घटना मध्यप्रदेशातही घडल्याचं दिसून येतं आहे.

दरम्यान, अक्षय बम यांनी काँग्रेसला धक्का दिल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी हाय कमांडवर नाराजी व्यक्त केलीय.. कामाऐवजी पैशाच्या आधारावर अक्षय बम यांनी तिकिट दिल्यामुळेच असं घडल्याचं काँग्रेस नेत्यांचं मत आहे.

दरम्यान, 400 चा आकडा पार करण्यासाठी भाजप कोणतीही नीती वापरायला तयार आहे. मात्र काँग्रेसच्या घोषित उमेदवाराने लढाईच्या आधीच शस्त्र टाकणं हेदेखील काँग्रेस हायकमांडचच अपयश आहे. त्यामुळे आता सूरत आणि इंदूरच्या धक्क्यातून काँग्रेस काही बोध घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com