Earthquake  Saam tv
देश विदेश

earthquake : महाराष्ट्रा शेजारील राज्य भूकंपाने हादरले, साखरझोपेत असताना जाणवले धक्के

Gujarat Kutch earthquake early morning : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात पहाटे ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. काही सेकंद धक्के जाणवले.

Namdeo Kumbhar

Gujarat earthquake update : साखरझोपत असतानाच गुजरातमधील कच्छ जिल्हा भूकंपाने हादरला. पहाटे साडेचार वाजता अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अनेकांनी घराच्या बाहेर पळ काढला. काही सेकंदापर्यंत कच्छमध्ये भूकंपाचे धक्का जाणवले. या भूकंपामुळे शहरात भीतीचे वातावरण होते.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी म्हणजेच, एनसीएस यांच्यानुसार कच्छमधील या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची तीव्रता मध्यम असल्याची नोंद करण्यात आली. पण पहाटेच्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक होते. एनसीएसनुसार, भूकंपाचा केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त १० किलोमीटर खाली होता. उथळ खोलीवर होणारे भूकंप सहसा अधिक तीव्रतेने जाणवतात. पण कच्छमध्ये भूकंपाचा फारसा परिणाम जाणवला नाही.

नुकसान, जिवितहानी नाहीच -

गुजरातच्या कच्छमध्ये झालेल्या भूकंपामध्ये कोणतीही जिवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची अधिकृत्त वृत्त आलेले नाही. स्थानिक अधिकाऱ्यांकडून कच्छमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी, तलाठ्यासह इतर अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील कर्मचारी कच्छमधील रहिवाशांच्या संपर्कात आहेत. कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये, असे त्यांनी नागरिकांना सांगितले. फक्त सरकारच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, त्याशिवाय कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

२००१ मध्ये हजारो लोकांचा मृत्यू -

कच्छ हा जिल्हा भूकंपाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो. या ठिकाणी सतत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतात. १३ डिसेंबर रोजीही ३.९ रेश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप कच्छमध्ये झाला होता. त्यावेळीही कोणतेही नुकसान झालेले नव्हते. २६ जानेवारी २००१ रोजी कच्छमध्ये सर्वात मोठा भूकंप आला होता. त्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हापासून कच्छ हा जिल्हा संवेदनशील मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT