Iran–Israel War: कोल्हापुरातील १०० नागरिक दुबईत अडकले, व्हिडिओद्वारे सांगितली परिस्थिती, VIDEO

100 tourist of Kolhapur Stranded in Dubai : इराण-इस्रायल युद्धाचा भडका उडाला असून, त्याची धग महाराष्ट्रातील कोल्हापूरपर्यंत पोहोचली आहे. पर्यटनासाठी कोल्हापूरमधून दुबईत गेलेले १०० नागरिक अडकले आहेत.

रणजीत माजगांवकर, कोल्हापूर, साम टीव्ही

इराण- इस्रायल युद्धाची ठिणगी पडली असून, संघर्ष अधिकच चिघळला आहे. युद्धामुळं परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. दुबईतही अनेक ठिकाणी हल्ले झाल्याचे सांगण्यात येत असून, भीतीचे वातावरण आहे. कोल्हापुरातील १०० नागरिक दुबईत अडकले आहेत. हे सर्व पर्यटनासाठी दुबईत गेले होते. इस्रायल आणि इराण या दोन देशांतील युद्धामुळे दुबईतून विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे पर्यटक तेथे अडकले आहेत. सहल प्रमुख सतीश पोवार यांच्याकडून याबाबत माहिती देण्यात आली असून, सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. तेथील परिस्थितीचे आणि पर्यटक सुरक्षित असल्याचे व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. पोवार हे सहल प्रमुख असून, पर्यटकांना घेऊन ते दुबईत सहलीसाठी गेले होते. सर्व जण सुरक्षित असून, येथील मिरॅकल गार्डनमध्ये फिरत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आखाती देशांत अडकलेल्या कोल्हापूरच्या नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनानं कार्यवाही सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुमारे दीडशे नागरिक विविध ठिकाणी अडकले असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या माहितीनुसार, आखाती देशांत अडकलेल्या सुमारे १५० नागरिकांपैकी १३० जणांची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली आहे. प्रशासन त्यांच्यासोबत सातत्याने संपर्कात असून ते सुरक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com