Gujarat Fire News Saam TV
देश विदेश

Gujarat Fire News : द्वारकामध्ये अग्नितांडव! घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

Devbhumi Dwarka Fire News : पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाली. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

Ruchika Jadhav

Gujarat :

गुजरातच्या द्वारका येथून थरारक घटना समोर आली आहे. परिसरातील एका घराला अचानक आग लागलीये. घराला आग लागली तेव्हा कुटुंबातील सदस्य घरामध्येच होते. आगीने रौद्ररुप धारण केल्याने कुटुंबीयांचा जीव गुदमरू लागला. या घटनेत एका लहान बालकासह ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाली. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य रोड परिसरात रविवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी कुटुंबातील ५ व्यक्ती घरामध्ये गाढ झोपेत होत्या. आग घराच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. घरातील गाद्या आणि अन्य लाकडी सामान जळाल्याने मोठ्याप्रमाणावर धूर झाला होता.

या धूरामुळे घरातील सर्वजण गुदमरू लागले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. घरातील एअरकंडीशन ओव्हर हिट झाल्याने आग लागली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमध्ये एक वृद्ध आजींचा जीव वाचलाय.

वृद्ध आजी या घरातील ग्राउंडफ्लोअरमध्ये असलेल्या खोलीत होत्या. खोलीमध्ये आजी देखील झोपल्या होत्या. त्यांचा या घटनेत जीव वाचला आहे. आगीचं ठोस कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये १४ वर्षीय मुलीचा बालविवाह, बनावट आधारकार्डवर छापली खोटी जन्मतारीख; पोलिसांनी उधळला डाव

Maharashtra Live News Update: तालुक्यासाठी अधिकचा निधी आणायचा असेल तर नावही बदली करावे लागते, आमदार मांडेकर यांचे वक्तव्य

Skin Care: रात्री केलेल्या या ३ चुकांमुळे तुमचा चेहरा हळूहळू डल आणि वयस्कर होतो

Crime News: तब्बल 400 कोटी रुपये असलेले दोन कंटेनर चोरीला; कर्नाटकातील चोरीचं नाशिक कनेक्शन काय?

Chana Rassa Bhaji Recipe: बोटं चाखत राहाल! घरीच बनवा हॉटेलसारखी झणझणीत चण्याची रस्सा भाजी

SCROLL FOR NEXT