Gujarat Crime Saam Tv
देश विदेश

Crime: शक्तीवर्धक गोळ्या घेऊन ठेवायचा शरीरसंबंध, त्रासाला कंटाळून महिलेने नवऱ्याला संपवलं

Gujarat Crime: गुजरातमध्ये महिलेने नवऱ्याची निर्घृण हत्या केली. शक्तीवर्धक गोळ्या घेऊन तो तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवायचा. या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलत त्याला संपवलं.

Priya More

Summary:

  • गुजरातमध्ये महिलेने नवऱ्याला संपवलं

  • नवरा शक्तीवर्धक गोळ्या घेऊन तिच्याशी शरीरसंबंध ठेवायचा

  • यामुळे महिलेला दुखापत व्हायची

  • याच त्रासाला कंटाळून तिने त्याची हत्या केली

गुजरातच्या सूरतमध्ये एका महिलेने नवऱ्याची निर्घृण हत्या केली. नवरा शक्तीवर्धक गोळ्या घेऊन सतत शरीरसंबंध ठेवायचा. या त्रासाला कंटाळून महिलेने नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचला. नवऱ्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृत्यू आजारपणामुळे झाला असल्याचे महिलेने नातेवाईकांना सांगितले. पण अंत्यसंस्काराच्या वेळी मृत व्यक्तीच्या भावाला संशय आला आणि त्याने पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तर गळा दाबून त्या व्यक्तीची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, महिलेने ५ जानेवारीला नवऱ्याला दूध दिले. तिने उंदीर मरण्याचे औषध दुधात मिसळले होते. हे दूध प्यायल्यानंतर नवरा बेशुद्ध पडला. त्यानंतर महिलेने त्याची गळा दाबून हत्या केली. नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर तिने आजारपणाने त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पण सत्य समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत २५ जानेवारीला तिला अटक केली. हे नवरा-बायको मुळचे बिहारचे होते आणि ते कामासाठी गुजरातमध्ये राहत होते.

महिलेने चौकशीदरम्यान सांगितले की, तिचा नवरा शक्तीवर्धक गोळ्या घेतल्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवायचा. यामुळे तिला गंभीर दुखापत व्हायची आणि रक्तस्त्राव व्हायचा. यामुळे महिला खूप त्रास सहन करावा लागायचा. महिलेचा नवरा मुंबईत मजूर म्हणून काम करत होता आणि महिन्यातून एकदा सुरतमधील त्याच्या घरी येत होता. १ जानेवारीच्या रात्री महिलेने तिच्या नवऱ्याला हळदीचे दूध दिले. त्यामध्ये तिने गुपचूप उंदीर मारण्याचे औषध मिसळले होते. पण तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला नाही.

जेव्हा नवऱ्याचा मृत्यू झाला नाही तेव्हा महिलेने ५ जानेवारी रोजी तिच्या नवऱ्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याला सुरतमधील रुग्णालयात नेण्यात आले. जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला, आरोपी महिलेने असा दावा केला की नवऱ्याचा मृत्यू आजारपणामुळे झाला. पण मृताच्या भावाला संशय आल्यामुळे हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी महिलेची चौकशी करून तिला नंतर बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: रोज घालण्यासाठी कोणते मंगळसूत्र बेस्ट?

ITI चे आधुनिकीकरण ते मुद्रांक शुल्क; फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात घेतले ५ महत्वाचे निर्णय

Maharashtra Live News Update: जळगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण

PMPML Mobile App: तिकीटासह पासची सेवाही अ‍ॅपवर; पीएमपी ॲपमुळे पुणेकरांचा प्रवास झाला सोपा

Masala Maggi Recipe: फक्त १० मिनिटांत नाश्त्याला बनवा मसाला मॅगी

SCROLL FOR NEXT