Arvind Kejriwal Saam TV
देश विदेश

भाजप-काँग्रेसचे इलू इलू! गुजरात काँग्रेस भाजपात विलीन होणार; केजरीवालांचा दावा

'एकीकडे भाजपचे २७ वर्षांचे कुशासन' आहे. तर दुसरीकडे आपचे 'नवे राजकारण' आहे.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच भाजप आणि काँग्रेसबाबत मोठा दावा केला आहे. गुजरात काँग्रेस (Gujarat Congress) लवकरच गुजरात भाजपमध्ये विलीन होणार असल्याचं केजरीवाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

यावेळी केजरीवाल म्हणाले, 'गुजरात निवडणूक ही आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातच होणार आहे. कारण गुजरात काँग्रेस लवकरच गुजरात भाजपमध्ये (BJP) विलीन होणार आहे. भाजप आणि काँग्रेसचे ईलू-ईलू संपणार असल्याचंही ते म्हणाले. तर एकीकडे भाजपचे २७ वर्षांचे कुशासन' आहे. तर दुसरीकडे आपचे 'नवे राजकारण' आहे, असल्याचही केजरीवाल म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल हे गुजरात दौऱ्यावर आहेत. रविवारी ते गुजरातच्या बोदेली येथे बोलत असताना त्यांनी काँग्रेससह भाजपवर निशाणा साधला. शिवाय यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक बेरोजगार तरुणाला रोजगार देणार आणि जोपर्यंत रोजगार मिळत नाही, तोपर्यंत महिन्याला ३ हजार रुपये महागाई भत्ता देणार असल्याची घोषणा देखील केजरीवाल यांनी केली.

शिवाय राज्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासंदर्भात आणि मोफत वीज देण्यासंदर्भातही आश्वासने दिलं. तसंच यावेळी त्यांनी पंजाबमध्ये २५ लाख घरांना 'शून्य' वीज बिल आलं आहे आणि दिल्लीतील अनेक लोकांनाही अशीच सुविधा मिळत असल्याचही त्यानी सांगितलं. तसेच 'आमचे पहिले वचन विजेसंदर्भात आहे. गुजरातमधील लोक वीजबिलाबाबतीत अत्यंत त्रस्त झाले असल्याचही केजरीवाल म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

SCROLL FOR NEXT