गुजरात : भाजप आमदार आशा पटेल यांचा डेंग्यूने मृत्यू ! वृत्तसंस्था
देश विदेश

गुजरात : भाजप आमदार आशा पटेल यांचा डेंग्यूने मृत्यू !

वयाच्या 44व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वृत्तसंस्था

गुजरात : भारतीय जनता पार्टीच्या (BJP) आमदार आशा पटेल (Asha Patel) यांचा वयच्या (44व्या) वर्षी डेंग्यूवर उपचार सुरू असताना रविवारी निधन झाले आहे. माहितीनुसार, त्यांच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. याबद्दल पक्षाच्या नेत्यांनी अधिक माहिती दिली की, मेहसाणा जिल्ह्यातील उंझा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आशा पटेल यांना जयदल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ता. 10 डिसेंबर रोजी त्यांना दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

हे देखील पहा-

त्याचवेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी पत्रकारांना सांगितले की, "अत्यंत दु:खाने कळवत आहे की, उंझा विभागाच्या आमदार आशा पटेल या आता आमच्यात नाहीत. डेंग्यूच्या उपचारासाठी त्यांना अहमदाबादच्या झायडस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांच्या टीमने सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही.

नितीन पटेल यांनी असेही सांगितले की त्यांचे पार्थिव उंझा येथे नेले जाईल, जिथे सामान्य लोक त्यांना अंतिम श्रद्धांजली देऊ शकतील आणि सोमवारी सिद्धपूर स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार केले जातील. भाजपच्या गुजरात युनिटने एका निवेदनात म्हटले आहे की दिल्लीहून परतल्यानंतर पटेल यांना डेंग्यू झाला होता आणि रविवारी या आजाराविरुद्धची लढाई हरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT