political parties donations  social media
देश विदेश

अबब! गुजरातमध्ये 'बेनाम' पक्षांना ४३०० कोटींच्या देणग्या, निवडणूक आयोग पुन्हा राहुल गांधींच्या निशाण्यावर

Gujarat benami parties donations : गुजरातमध्ये १० बेनाम पक्षांना पाच वर्षांत ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्यानं वृत्त प्रकाशित झालं आहे. यावरून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. इतका पैसा आला कुठून, त्याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Saam Tv

राजकीय पक्षांना वेळोवेळी मिळालेल्या देणग्यांवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. देणग्या घेणारे राजकीय पक्ष संशयाच्या फेऱ्यात अडकतात, तर कधी याच राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्यांवर शंका घेतली जाते. काँग्रेससह विरोधी पक्षांनी मतदार यादी घोळ आणि मतचोरीच्या आरोप करून निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना दैनिक भास्करच्या वृत्तानं पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. गुजरातमध्ये १० अज्ञात राजकीय पक्षांना पाच वर्षांत ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचं वृत्त प्रकाशित करण्यात आलं आहे. यावरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे.

दैनिक भास्करने प्रकाशित केलेल्या वृत्ताचं कात्रण राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलं आहे. त्यात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गुजरातमध्ये काही अज्ञात पक्ष आहेत, ज्यांची नावं कधीच ऐकली नाहीत. पण त्यांना ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळालेल्या आहेत. या राजकीय पक्षांनी खूप कमी वेळा निवडणुका लढवल्या आहेत. तसेच पैसे खर्च केले आहेत.

राहुल गांधींनी यासंबंधित अनेक प्रश्न विचारले आहेत. हे हजारो कोटी रुपये आले कुठून? हे राजकीय पक्ष कुणाचे, ते चालवतं कोण? निवडणूक आयोग चौकशी करणार का किंवा यावेळीही शपथपत्राची मागणी करणार? डेटा लपवण्यासाठी पुन्हा कायद्यात बदल करणार का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी गेल्या दोन महिन्यांपासून निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहेत. आयोगाच्या कारभाराविरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत. या देशात निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. गुजरातमधील राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांवरूनही त्यांनी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं आहे. निवडणूक आयोगाच्या कोर्टात चेंडू टाकताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग यावर काही कारवाई करणार का, असा सवालही त्यांनी केला आहे.

मागील निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच बिहारमधील एसआयआरला विरोध करत त्यांनी बिहारमध्ये व्होट अधिकार यात्राही काढली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपला निवडणूक जिंकून देण्यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, गुजरातमधील या १० अज्ञात राजकीय पक्षांना २३ जणांकडून देणग्या देण्यात आलेल्या आहेत. देणग्या घेणाऱ्या राजकीय पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आपापले उमेदवार उभे केले होते. या पक्षांना दोन्ही निवडणुकांमध्ये एकूण ५४०६९ मते मिळाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Udyan Scheme 2025 : ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी प्रत्येकी १ कोटींचा निधी, एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune : वर मेट्रो, खाली बस धावणार! पुण्यात ११ किमीचा डबलडेकर उड्डाणपूल, पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

Aircraft navigation lights: रात्रीच्या वेळी विमानावर निळे आणि लाल लाईट्स का लावले जातात?

Farmer suicide : अधिकाऱ्याची धमकी, पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याची आत्महत्या, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Soyabean Crop : अस्मानीसोबत सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला; ८ एकरवरील सोयाबीनला ना फुल ना शेंगा, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT