Expensive Number Plate Saam TV
देश विदेश

Expensive Number Plate : नादच खुळा! जगातील सर्वाधिक महागडी नंबर प्लेट; किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का

कोटींच्या घरात झेप घेतलेल्या या नंबर प्लेटची गिनीज वलर्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Dubai : आतापर्यंत तुम्ही अनेक महागड्या चारचाकी गाड्या पाहिल्या असतील. बीएमडब्लू, ऑडी अशा कारची किंमत तर कोटींच्या घरात पोहचलेली आहे. कारची किंमत कोटीच्या घरात असने यामध्ये काही नवल नाही. मात्र तुम्ही कोटींच्या घरात विकली गेलेली नंबर प्लेट पाहिली आहेत का? (Car Number Plate)

कोटींच्या घरातली VIP कार नंबर प्लेट

मिळालेल्या माहितीनुसार, 'मोस्ट नोबल नंबर्स' या चॅरिटीच्या लिलावात एका कारची नंबर प्लेट ५५ दशलक्ष दरहम म्हणजे १२२.६ कोटी रुपये होय. या नंबर प्लेटचा नंबर आहे पी ७. ही जगातली सर्वात महागडी नंबर प्लेट आहे. कोटींच्या घरात झेप घेतलेल्या या नंबर प्लेटची गिनीज वलर्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद करण्यात आली आहे.

सध्या या नंबर प्लेटचं विशेष कौतुक होतंय. पी ७ हा क्रमांक या नंबर प्लेटच्या खरेदीदारासाठी खूप लकी असावा. मात्र अद्याप एवढी महागडी नंबर प्लेट खरेदी करणारी व्यक्ती कोण आहे याची माहिती समोर आलेली नाही.

चांगल्या कामी लागणार लिलावाचा पैसा

लिलावात आलेले पैसे चांगल्या कामासाठी वापरले जाणार आहेत. जागतिक पातळीवर उपासमारीची समस्या अद्यापही पूर्णता मिटलेली नाही. त्यामुळे लिलावात आलेला हा पैसा या कामासाठी वापरला जाणार आहे. रमजानमध्ये अन्न निधी उपलब्ध करणे हे या लिलावाचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले जात आहे.

१५ दशलक्षांपासून बोलीला सुरूवात

साल २००८ मध्ये अबू धाबी येथे एका कारचा लिलाव करण्यात आला. या लिलावात १ नंबर प्लेट ५२.२ दशलक्ष दिरहम म्हणजे ११६.३ कोटी रुपयांना विकली गेली होती. हा विक्रम मोडण्यासाठी यंदा पी ७ क्रमांकाची बोली लावण्यात आली होती. त्यावर दिरहम १५ दशलक्षांपासून बोलीला सुरूवात झाली शेवटी ५५ दशलक्ष दरहमवर ही बोली थांबली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एक मंडळ एक ढोल पथक करा, गणेश मंडळांची पोलिसांना विनंती

Dadar Kabutar Khana: दादरमध्ये कबुतर खाना कुठे आहे?

Nashik Crime : दारु पिण्यास मागितले पैसे; कुटुंबीयांनी नकार दिल्याने राग अनावर, पेट्रोल टाकून राहते घरच पेटविले

Pune Accident: रक्षाबंधनाआधीच बहीण-भावाची ताटातूट, अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू, बहिणीची मृत्यूशी झुंज

Mrunal Thakur: कुमकुम भाग्य नव्हे तर ही होती मृणाल ठाकूरची पहिली मालिका

SCROLL FOR NEXT