Punjab: पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला Twitter
देश विदेश

Punjab: पठाणकोटमधील आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला

घटनास्थळी पोलीस दल हजर असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

वृत्तसंस्था

पंजाबमधील पठाणकोटमधील धिर पुलाजवळ आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी द्वार गेटवर सोमवारी सकाळी ग्रेनेडचा स्फोट झाला. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी हा ग्रेनेड फेकल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दल हजर असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

या स्फोटानंतर पठाणकोट आणि पंजाबमधील सर्व पोलीस चौक्यांना अलर्ट करण्यात आले आहे.यासोबतच पठाणकोट एअर फोर्स स्टेशन आणि इतर आर्मी कॅम्पभागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.या स्फोटात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावरून ग्रेनेडचे काही तुकडे जप्त केले आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला कंटेनरची जोरदार धडक; लोखंडी रॉड बसच्या आरपार घुसला अन्...

Punjabi Chole Recipe: पंजाबी स्टाईल छोलेची ही सिक्रेट रेसिपी आत्ताच करा नोट

Maharashtra Live News Update: नागपूर महापालिकेवर महिलाराज

Bigger Lips Lipstick Shades: ओठ मोठे दिसण्यासाठी लावा या 5 रंगाच्या लिपस्टिक

Gold Price Today: सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, १० तोळे ९०,५०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

SCROLL FOR NEXT