Greater Noida Tragedy Saam
देश विदेश

आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

Woman Jumps with Son from 13th Floor: ग्रेटर नोएडा वेस्ट ऐस सिटी सोसायटीच्या १३व्या मजल्यावरून एका महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

  • ग्रेटर नोएडा वेस्टच्या ऐस सिटी सोसायटीत धक्कादायक घटना उघडकीस

  • साक्षी चावला हिने १३व्या मजल्यावरून उडी मारली; मुलगा दक्षलाही खाली ढकलल्याचा संशय

  • पोलिसांना सुसाईड नोट आणि खुर्चीचा पुरावा मिळाला, CCTV तपास सुरु

  • मानसिक आजार व नैराश्यामुळे आत्महत्येचा मार्ग निवडल्याचे प्राथमिक माहिती.

ग्रेटर नोएडा वेस्टमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐस सिटी सोसायटीच्या १३ व्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेनं आत्महत्या केली. शनिवारी सकाळी मुलाला इमारतीवरून धक्का दिल्यानंतर आईनं उडी मारल्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून, एकुलत्या एक मुलाच्या आजारामुळे आई नैराश्यात होती. तिनं नोकरीही सोडली होती. याच नैराश्यातून तिनं आत्महत्या केली असल्याची माहिती आहे.

बिसरख कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी चावला असं मृत महिलेचं नाव आहे. तर, दक्ष चावला असं तिच्या मुलाचे नाव आहे. दक्ष चावला हा मानसिक आजाराने त्रस्त होता. सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले की, साक्षी मुलाची काळजी घेत होती. मुलाची तब्येत ठिक व्हावी म्हणून ते अनेक देवस्थानात गेले.

पण दक्ष लवकर बरा झाला नाही. त्याला शाळेत धाडले नव्हते. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. साक्षीने कधीही मुलाला एकटे सोडले नाही. मुलाच्या आजारपणामुळे ती प्रचंड खचली. त्यामुळे तिनं हे मोठं उचलल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटच्या बाल्कनीत एक खुर्ची सापडली आहे. महिलेनं तिच्या मुलाला खुर्चीवर उभे करून खाली ढकलल्याचा संशय आहे. त्यानंतर तिनं स्वत: उडी मारली. घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस सध्या जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासात आहे.

पोलिसांना महिलेच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये महिलेनं तिच्या पतीची माफी मागितली आहे. 'माफ करा. आम्ही हे जग सोडून जात आहोत. आम्हाला आता तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे. आमच्यामुळे तुमचे आयुष्य खराब करू नका. आमच्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही'. घटनेच्या दिवशी साक्षीचे पती दुसऱ्या खोलीत झोपले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Watch: अ‍ॅपल वॉचमुळे वाचला समुद्रात बुडणाऱ्या तरुणाचा जीव, अनुभव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

IND W vs PAK W: अग बया! चेंडू खेळला पण क्रीझमध्ये बॅट ठेवायची विसरली अन्...; पाकिस्तानची कर्णधार पंचांना थेट भिडली

Two Group Clash : दुर्गा मूर्ती विसर्जनावरून दोन गटात राडा; वाहन आणि दुकानांची तोडफोड, पोलिस आयुक्तांसहित अनेक जखमी

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? कार अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर

Ro-Ro Service: 200 प्रवासी आणि 75 वाहनं असलेली रो रो बोट अडकली; विरारच्या समुद्रातील थरार

SCROLL FOR NEXT