Uttar Pradesh Noodles Tragedy  AI Image
देश विदेश

Shocking : नूडल्स खाऊन झोपले, सकाळी उठलेच नाहीत, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

Uttar Pradesh Greater Noida News : ग्रेटर नोएडामध्ये पती-पत्नीसह तीन मुलांचा संशयास्पद मृत्यू. रात्री नूडल्स खाल्ल्याची माहिती समोर आली असून, अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • ग्रेटर नोएडात पाच जणांचा मृत्यू

  • कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या तीन लहान मुलांचा संशयास्पद मृत्यू

  • नूडल्स मधून विषबाधा झाल्याचा संशय

  • पोलिसांचा तपास सुरू

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबाच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रात्रीच्या जेवणात नूडल्स खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रबूपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला श्री पदम गावात घडली. शनिवारी सकाळी बराच वेळ होऊनही घरातील कोणीही बाहेर आले नाही. म्हणून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला आणि आवाज दिला; मात्र आतून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर खिडकीतून डोकावून पाहिले असता घरातील पाचही जण बिछान्यावर पडल्याचे दिसून आले.

याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून घरात एन्ट्री केली. त्यावेळी कुटुंबातील सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांनी सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर पाचही जणांना मृत घोषित केले. मृतांची नावे महेश (वय ३७), त्यांची पत्नी ललिता (वय ३५), तसेच त्यांची मुले लड्डू (वय ११), मिष्टी (वय ७) आणि साक्षात (वय ३) अशी आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस पथक, वैद्यकीय कर्मचारी आणि अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महेश यांच्या आईसह शेजाऱ्यांनी कुटुंबाने रात्री नूडल्स खाल्ल्याचे सांगितले आहे. अन्नाचे नमुने, वैद्यकीय तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून, या घटनेचे गूढ उकलण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Same Food Side Effect: तुम्हीही रोज एकच नाश्ता किंवा जेवण करता का? वाचा काय घडते तुमच्या शरीरात!

Maharashtra News Live Update: नंदुरबार बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात

Pune News: पुण्यात राष्ट्रवादीच्या २ बड्या नेत्यांविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Banana : केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, वर्कआऊटपूर्वी की रात्रीच्या जेवणानंतर?

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

SCROLL FOR NEXT