sharda university bds student found dead in girls hostel x
देश विदेश

Crime : मी अजून सहन करु शकत नाही...; विद्यार्थिनीने वसतिगृहात स्वत:ला संपवलं, सुसाईट नोटमध्ये लिहिलं...

Crime News : ग्रेटर नोएडाच्या शारदा विद्यापीठाच्या महिला वसतिगृहात बीडीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

Yash Shirke

Student Suicide : काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने लैंगिक छळाला कंटाळून स्वतःला पेटवून आत्महत्या केली होती. अशीच एक धक्कादायक घटना आता ग्रेटर नोएडामध्ये घडली आहे. ग्रेटर नोएडाच्या शारदा विद्यापीठात बीडीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. प्राध्यापकांकडून होणाऱ्या छळामुळे तरुणीने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

शुक्रवारी (१८ जुलै) विद्यार्थिनीने महिला वसतिगृहात आत्महत्या केली. त्यानंतर गौतम बुद्ध नगर येथील नॉल पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थिनीच्या वसतिगृहातील खोलीत पोलिसांना सुसाईड नोट सापडली. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी पीसीपी आणि डेंटल मटेरियलच्या प्राध्यपकांना जबाबदार धरले जावे असा उल्लेख विद्यार्थिनीने केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विद्यार्थिनीने तिच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या दोन प्राध्यापकांच्या नावांचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला. यांनी मला मानसिक त्रास दिला. माझा अपमान केला. मी त्यांच्यामुळे बऱ्याच काळापासून तणावात आहे. त्यांनीही माझ्याइतका त्रास सहन करावा असे मला वाटते. मला माफ करा, आता मी असे जगू शकत नाही. मी काहीच करु शकत नाही, असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. महाविद्यालय प्रशासनाने घटनेची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी करण्यात आली. काही काळासाठी संपूर्ण कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही विद्यार्थ्यांनी पोलिसांशी वाद देखील घातला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसानी दोन प्राध्यापकांना अटक करण्यात आली.

'आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे विद्यापीठ व्यवस्थापनातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून सविस्तर चौकशी सुरु आहे', असे ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त सुधीर कुमार यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social Media Platform: इन्स्टाग्राम की युट्यूब? कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होते अधिकची कमाई, वाचून व्हाल थक्क

India Alliance Protest: राहुल गांधी, संजय राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला| VIDEO

Navi Mumbai-Mumbra : दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, मुंब्रा ते नवी मुंबईला प्रवास सुसाट होणार, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतलं

अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, ५ नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबईत चाललंय काय?

SCROLL FOR NEXT