GST OFFICER SUFFERS HEART ATTACK DURING REVIEW MEETING IN GREATER NOIDA saam tv
देश विदेश

अतिरिक्त आयुक्तांनी अधिकाऱ्याला फटकारलं; भर मिटिंगमध्येच उपायुक्तांना आला हृदयविकाराचा झटका

Deputy Commissioner Heart Attack During Review Meeting : ग्रेटर नोएडा येथील जीएसटी (GST) विभागात आढावा बैठक सुरू असताना उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. बैठकीदरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी त्यांना फटकारलं होतं.

Bharat Jadhav

  • ग्रेटर नोएडा जीएसटी विभागातील आढावा बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका आला.

  • बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी त्यांना फटकारल्याची माहिती समोर आली आहे.

  • घटनेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांवरील वाढत्या कामाच्या तणावाचा मुद्दा चर्चेत आला

कार्यालय कोणतेही असो, प्रत्येक ठिकाणी कामाचा दबाव असतोच. सराकरी कार्यालयातही कर्मचाऱ्यांवर दबाव असतो. कामे वेळेवर झाली नाही तर किंवा कामांमध्ये काही चुका झाल्यातर वरीष्ठ साहेब कर्मचाऱ्यांना फटकारत असतात.

परंतु साहेबाचं ओरडणं जीएसटी अधिकाऱ्याच्या जीवाशी आल्याची घटना ग्रेटर नोएडा येथील जीएसटी विभागाच्या कार्यालयात घडली आहे. आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्तांचा पारा चढला होता. भर बैठकीत त्यांनी उपायुक्तांना झापलं, मिटींगमध्ये फटकारल्याचा धसका बसल्यानं उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका आला.

अधिकाऱ्यांची नावे काय आहेत?

वेद प्रकाश सिंह असं उपायुक्तांचे नाव आहे. तर अतिरिक्त आयुक्तांचे नाव संदीप भागिया आहे. आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप भागिया यांनी जीएसटी अधिकारी उपायुक्त वेद प्रकाश सिंह यांना त्यांनी कामावरून सुनावलं. त्यादरम्यान उपायुक्तांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. अधिकाऱ्यांनी आरोप केला की, अतिरिक्त आयुक्त त्यांना रागावले त्यानंतरच वेद सिंह यांची तब्येत बिघडली.

हार्ट अटॅक आला

अतिरिक्त आयुक्त संदीप भागिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक चालू होती. त्या बैठकीत वेद प्रकाश सिंह यांच्याकडून संदीप भागिया यांनी एक अहवाल मागितला. या अहवालाची फाईल देण्यात वेद प्रकाश सिंह यांना उशिर लागला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त यांच्या रागाचा पारा चढला. चालू मीटिंगमध्येच त्यांनी वेद सिंह यांना खडेबोल सुनावले. त्याचदरम्यान त्यांना हार्ट अटॅक आला .

कर्मचाऱ्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपायुक्त वेद प्रकाश सिंह यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान त्यांच्याशी उद्धट वर्तन करण्यात आले. त्यांना मानसिक त्रास देण्यात आला, असा आरोप आता केला जातोय. दरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

बैठकीत आली चक्कर

उपायुक्तांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना चक्कर आली ते खाली पडले. त्यानंतर मिटींग रुमध्ये गोंधळ उडाला. कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना अतिरिक्त आयुक्त संदीप भागियाने बैठकीत अशी काही झालं नसल्याचं म्हटलं आहे. कोणत्याच प्रकारचे गैरवर्तन आणि शिवीगाळ झाली नाही, त्यांनी इतर अधिकाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT