Char Dham Yatra
Char Dham Yatra Saam tv
देश विदेश

केदारनाथ यात्रेला मोठा दिलासा, हेलिकॉप्टरचे भाडे वाढणार नाही

वृत्तसंस्था

केदारनाथ (Kedarnath) हेलिकॉप्टर सेवेच्या तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग सोमवारपासून सुरू होणार आहे. यावर्षी हेलिकॉप्टर सेवेचा दर मागील वर्ष प्रमाणेच असणार आहे. कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांत या सेवेचा योग्य वापर होऊ शकला नसला तरी, यंदा ती सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

नागरी विमान वाहतूक विभागाने दोन वर्षांपूर्वी केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवेसाठी नऊ ऑपरेटर्सची निवड केली होती. त्यानंतर निविदेतच तीन वर्षांसाठी भाडे निश्चित करण्यात आले, त्यामुळे 2020 मध्ये निश्चित केलेले भाडे चालू वर्षातही लागू होणार आहे.

हे देखील पहा -

नागरी विमान वाहतूक विभागाने यात्रा सुरु होण्याच्या सुमारे महिनाभर आधीपासून ऑनलाइन बुकिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. https://heliservices.uk.gov.in/ या वेबसाइटवरून ७० टक्के तिकिटांचे बुकिंग स्वीकारले जाईल तर उर्वरित 30 टक्के नोंदणी घटनास्थळी येणाऱ्या प्रवाशांसाठी केली जाणार आहे.

हेलिकॉप्टरने केदारनाथला जाणाऱ्यांसाठी गुप्तकाशीहून एकेरी भाडे ७७५० रुपये, फाटा येथून ४७२० रुपये आणि सिरसीहून ४६८० रुपये असेल. यावेळी प्रवासाच्या पहिल्याच दिवसापासून प्रवाशांसाठी हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध होणार असल्याचे नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव दिलीप जवळकर यांनी सांगितले.

सीएम पुष्कर सिंह धामी यांनी गुरुवारी यात्रेच्या तयारीचा आढावा घेताना अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी भाविकांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था ठेवण्यास सांगितले आहे. चार धामांमध्ये चोवीस तास वीजपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांकडून टप्प्याटप्प्याने केलेल्या तयारीची माहिती घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

वेळेवर आणि समाधानकारक वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करावी

वाहतूक व्यवस्थापन आणि ऑपरेशनसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा

चार धाम यात्रेकरूंच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांकही जारी करावा

प्रवाशांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वॉटर एटीएम बसवण्यात येणार यावे

हॉटेलमध्ये दर यादी आवश्यक असावी आणि भेसळीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'अतिथी देवो भव:चा संदेश चार धाम यात्रेच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचवला पाहिजे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यानुसार चार धाम यात्रेची तयारी सुरू आहे. यात्रेकरूंना यात्रा अधिकाधिक सोयीस्कर व्हावी यासाठी चोख व्यवस्था करण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी दिग्गज खेळाडूकडून टीम इंडियाची घोषणा; या स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

Honeymoon Destination : उन्हाळ्यात पार्टनरसोबत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत बेस्ट!

Today's Marathi News Live : पीएम मोदींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात होणार जाहीर सभा

Vastu Tips: कारमध्ये ठेवा या वस्तू, Negativity होईल दूर

Supriya Sule On Dynasticism | होय आम्ही घराणेशाहीतून आलो, सुळे यांची कबुली

SCROLL FOR NEXT