Tomato market price Today in Maharashtra Saam tv
देश विदेश

Tomato Price News: टोमॅटोच्या दरात केंद्र सरकारचा दिलासा, आता 1 किलो मिळणार इतक्या रुपयात...

Tomato market price Today in Maharashtra : टोमॅटोच्या दरात केंद्र सरकारचा दिलासा, आता 1 किलो मिळणार इतक्या रुपयात...

साम टिव्ही ब्युरो

Tomato market price Today in Maharashtra : टोमॅटोच्या दराबाबत देशात सर्वत्र चर्चा सुरू असून, किरकोळ बाजारात याचा भाव १६० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. मात्र यापूर्वी मोठे पाऊल उचलत ग्राहक व्यवहार मंत्रालयाने टोमॅटो ९० रुपये किलोने विकण्याची घोषणा केली होती.

आता पुन्हा एकदा ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाने टोमॅटोच्या किमती कमी केल्या आहेत. आता ९० रुपये किलो ऐवजी टोमॅटो ८० रुपये किलो दराने विकला जाणार आहे.

केंद्र सरकार ५०० ठिकाणी विकत आहे टोमॅटो

टोमॅटोच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली एनसीआरसह देशातील विविध भागात सरकार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थेट टोमॅटोची विक्री करत आहे.  (Latest Marathi News)

कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी केल्यानंतर NCCF थेट ग्राहकांना 90 प्रति किलो दराने टोमॅटो विकत होते आणि आता त्याची किंमत ८० रुपये प्रति किलो केली आहे. सरकार देशभरात जवळपास ५०० ठिकाणी थेट टोमॅटोची विक्री करत आहे.

लोकांनी टोमॅटोचा वापर केला कमी

लोकलसर्कलच्या सर्वेक्षणात टोमॅटोची खरेदी आणि वापर याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, ४६ टक्के कुटुंबे आता टोमॅटोसाठी १५० रुपये किलोपेक्षा जास्त दर देत आहेत. त्याच वेळी १४ टक्के कुटुंबांनी टोमॅटो खरेदी करणे बंद केले आहे आणि ६८ टक्के कुटुंबांनी त्यांचा वापर कमी केला आहे.

मुंबईत टोमॅटोचे भाव १६० रुपये पार्टी किलो आहेत. तर दिल्लीत २४ जून रोजी टोमॅटोचे भाव २०-३० रुपये किलोवरून वाढून थेट १८० रुपये किलो झाले. काही चांगल्या दर्जाच्या टोमॅटोची किंमतही २२० रुपये किलोपर्यंत गेली आहे. इतर शहरांमध्ये आणि तामिळनाडू आणि केरळसारख्या देशातील काही राज्यांमध्ये टोमॅटोचा भाव आजही १८० रुपये किलोपेक्षा जास्त आहे. टोमॅटोचे काही प्रकार तर त्याहूनही महागात विकले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC/Maratha Reservation: हैदराबाद गॅझेट GR विरोधात ओबीसी कोर्टात; मराठा आरक्षणाला आव्हान

Bus Accident: भीषण अपघात! भरधाव बसची टँकरला धडक, ५० फूट खोल दरीत बस पलटली, अनेकजण वाहनाखाली दबले

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालकांचं कौतुक; ७५ व्या वाढदिवसामिनित्त दिल्या शुभेच्छा

Fact Check : महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान? सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय?

मराठा विद्यार्थ्यांना SEBC चा फटका? MPSC निकालात कट ऑफ वाढला

SCROLL FOR NEXT