उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे शिक्षकाची आत्महत्या
नोकरी जाण्याच्या भीतीमुळे व टीईटी परीक्षेच्या तणावाखाली शिक्षकाचं टोकाचं पाऊल
मृत शिक्षक गणेशीलाल महोब्यात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक शिक्षकांमध्ये तणाव निर्माण
उत्तर प्रदेशातील हमीपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शिक्षकाने आत्महत्या केली आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. टीईटी परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ते दिवसरात्री अभ्यास करत होते. मात्र, परिक्षेचं टेन्शन घेतल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांना वारंवार नोकरी जाण्याची भीती होती. त्यामुळे ते बराच काळ तणावाखाली होते. याच तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.
सुप्रिम कोर्टानं शिक्षकांना टीईटी परिक्षा देणं अनिवार्य केलं आहे. त्यामुळे शिक्षक टीईटीच्या परिक्षेसाठी तयारी करत आहेत. पण काहींना टीईटी अभ्यासाचा मानसिक त्रास सहन होत नाहीये. गणेशीलाल असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते हमीरपूरच्या रथ कोतवाली भागातील रहिवासी होते. त्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या सक्तीमुळे निराश होऊन आत्महत्या केली आहे.
ते महोबाच्या उच्च प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी ते अत्रौलिया येथील त्यांच्या दुसऱ्या घरी गेले. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत शिक्षकाच्या मुलानं दिलेल्या माहितीनुसार, 'काही दिवसांपू्र्वी वडील गया येथे गेले होते. ते शनिवारी परतले. त्यानंतर ते शनिवारी घरातून बेपत्ता झाले. वडील दुसऱ्या घरी गेले'.
'वडिलांचा शोध घेत असताना दुसऱ्या घरी गेलो. तेव्हा वडिलांचा मृतदेह विजेच्या तारेला लटकलेल्या अवस्थेत आढळला'. हे पाहुन अनुरागला धक्का बसला. मुलाने सांगितले की, त्याच्या वडिलांना या वयात नोकरी जाण्याची भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
शिक्षकांना टीईटी परिक्षा उत्तीर्ण होणं का आवश्यक?
सर्वोच्च न्यायालयाने सरकारी शिक्षकांसाठी एक मोठा निर्णय दिला आहे. ज्याअंतर्गत आता प्रत्येक सरकारी शिक्षकाला टीईटी परिक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आता सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी शिक्षकाला टीईटी परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. जर एखादा शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाला नाही तर या शिक्षकाला राजीनामा द्यावा लागेल. किंवा सक्तीची निवृत्ती द्यावी लागेल. या निर्णयानंतर शिक्षकांमध्ये तणाव निर्माण झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.