E Rikshaw Mobile App saam tv
देश विदेश

E rickshaw : ई-रिक्षा मोबाइलद्वारे बंद पाडल्याचा दावा; सरकारची कठोर कारवाई; 3 अॅप तात्काळ प्ले स्टोरमधून हटवले

E rickshaw Mobile App : ई-रिक्षा मोबाइल अॅपच्या माध्यमातून बंद पाडली जात असल्याची चर्चा आणि दावे सोशल मीडियावर केले जात आहे. त्यानंतर सरकारने तात्काळ कारवाई करून संबंधित अॅप प्ले स्टोरमधून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

Saam Tv

चीनी स्मार्टफोन अॅपच्या माध्यमातून ई-रिक्षा बंद पाडली जात असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या प्रकरणी आता सरकारने कारवाई केली आहे. प्ले स्टोरमधून तीन अॅप हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारने BAT-BMS, Lossigy आणि Epoch-i-ion हे अॅप हटवण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. या अॅपचा वापर हा बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना रिमोटद्वारे बंद करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सूत्रांच्या म्हणण्यांनुसार, अशा प्रकारच्या अन्य कोणत्याही अॅपच्या माध्यमातून गैरवापर केला जात असेल तर, ते अॅप देखील ब्लॉक करण्यात येतील.

बॅट-बीएमएस हे एक मोबाइल अॅप्लिकेशन आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोर आणि अॅपल प्ले स्टोरवर होते. या अॅपचा वापर बॅटरी मॅनेजमेंटसाठी केला जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, याद्वारे सर्व कंपन्यांच्या बॅटरी मॅनेज करता येऊ शकत नाही.

हे अॅप ज्या कंपनीचे आहे, ती कंपनी देखील बॅटरीची निर्मिती करते. या कंपनीच्या स्मार्ट बॅटरी नियंत्रित करण्यासाठी हे अॅप वापरले जाते. ब्लूटूथच्या माध्यमातून स्मार्ट लिथियम बॅटरीला या अॅपला कनेक्ट केले जाते. बॅटरी चार्जिंग स्टेटस, व्होल्टेजसह इतर माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळते. काही बॅटरी या अॅपच्या माध्यमातून बंद किंवा सुरू केल्या जाऊ शकतात.

'आज तक'च्या वृत्तानुसार, बॅट - बीएमएस यांसारख्या अॅपबाबत सायबर एक्स्पर्टकडून सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. अशा अॅपच्या माध्यमातून ई-रिक्षा बंद केल्या जात असून सावध राहा, असे आवाहन इंटरनॅशनल कमिशन ऑफ सायबर सिक्युरिटी लॉचे चेअरमन पवन दुग्गल यांनी केले. अशा प्रकारचे कृत्य करणे गुन्हा असून, संबंधित दोषींना तुरुंगातही जावे लागू शकते, असेही ते म्हणाले.

ई-रिक्षा बंद करणे ही सामान्य कृती किंवा थट्टा नाही असे मला वाटते. हा एक गुन्हा आहे. आयटी अॅक्ट २००० च्या कलम ६६ आणि कलम ४३ अंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते. जर कोणी ई-रिक्षा कॉम्प्युटर सिस्टममध्ये मालकाच्या माहितीविना एन्ट्री करत असेल तर हा गुन्हा मानला जाऊ शकतो. अशा गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५ लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुढील दोन ते तीन दिवस राज्यात सर्वदूर पाऊस- IMD

तब्बल १.५ कोटींची कॅश अन् सोन्याची बिस्किटं! अकोल्याच्या 'त्या' लाचखोर जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं मोठं घबाड

पावसाळ्यात 'हे' 3 पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉइझनिंगचा होऊ शकतं

Uddhav Thackeray: राम मंदिर देणगी घोटाळ्याविरोधात ठाकरे आक्रमक, रविवारी हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन

Maharashtra Rain Alert : पुढील ७२ तास धोक्याचे! 'या' ६ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; IMD चा सर्वात मोठा इशारा

SCROLL FOR NEXT