Government Jobs News Saam Tv
देश विदेश

बारावी पास असाल तर सरकारी नोकरीची संधी सोडू नका, ५०,२८९ जागांवर निघाली भरती

Government Jobs News या आठवड्यात ५०,२८९ सरकारी जागांसाठी भरती जाहीर झाली असून बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Namdeo Kumbhar

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या आठवड्यात अनेक जागेवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. योग्यतानुसार, अर्ज करता येईल. महत्त्वाचे म्हणजे, फक्त १२ वी पास असणार्‍यांना या भरतीचा सर्वाधिक फायदा होणार आहे. एसएससी, एसबीआयसह देशभरात अनेक ठिकाणी नोकरीची संधी आलेली आहे. पात्र उमेदारेच अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली. ५०२८९ जागांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १२ वी पास असणार्‍यांसाठी हा एक चांगला पर्याय असेल.

SSC जीडी कॉन्सटेबल

SSC जीडी कॉन्सटेबलसाठी 25, 487 जागांसाठी भरती निघाली आहे. १ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरूवात झाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासाठी दहावी पास ही अट आहे. ऑनलाईन लेखी परीक्षा असेल. त्यानंतर फिजिकल आणि मेडिकल घेतली जाईल. निवड झाल्यास पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळी होईल.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये २,७५५ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २८ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू झाले असून १८ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छुक उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याशिवाय संबंधित क्षेत्रात डिप्लोमा किंवा आयटीआय पदवी अनिवार्य आहे. निवड गुणवत्तेवर आधारित असेल, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा घेतली जाईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया

बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एसबीआयकडून उत्तम संधी मिळाली. स्टेट बँक ऑफ इंडियाने एकूण ९९६ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज २ डिसेंबर रोजी सुरू झाले आणि २३ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येतील. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतींवर आधारित निवड केली जाईल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.

गुजरात पोलीस

गुजरात पोलिसात १३,५९१ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. गुजरात पोलिस भरती मंडळात भरतीसाठी अर्ज ३ डिसेंबरपासून सुरू झाली. २३ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. अर्जदार १२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर असावा. पीईटी, पीएसटी, लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीद्वारे निवड केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांच्या घरावर ड्रोन हल्ला, युद्ध पुन्हा भडकणार?

Maharashtra Live News Update : अकोला महापालिकेत 'भाजप-राष्ट्रवादी' युतीची घोषणा

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

SCROLL FOR NEXT