Mobile Sim Card : saam Tv
देश विदेश

तब्बल २ कोटी मोबाइल नंबर अचनाक बंद, सरकारने का घेतला निर्णय, वाचा सविस्तर

government blocked 2 crore fake mobile numbers : फसवणुकीचे प्रकार कमी करण्यासाठी आणि स्पूफ कॉल्सला आळा घालण्यासाठी सरकारने दोन कोटी बनावट क्रमांक बंद केले. कॉल करणारा व्यक्ती कॉलर आयडीवर खोटी माहिती देतो, ज्यामुळे कॉल दुसऱ्या व्यक्ती अथवा ठिकाणाहून आल्यासारखा भासतो.

Namdeo Kumbhar

  • सरकारने २ कोटी बनावट मोबाइल नंबर बंद केले

  • स्पूफ कॉल्समध्ये ९७% घट झाली

  • एआयच्या मदतीने ७८ लाख बनावट कनेक्शन बंद

  • संचार साथी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे फसवणुकीवर नियंत्रण

Telecom Department Launches Digital Platform to Detect Scam Numbers : मागील काही वर्षांपासून भारतात फसवणुकीच्या घटना सुरू आहेत. फोनवरून फ्रॉड केल्याच्या घटना अनेकदा उघडकीस आल्या आहेत. काही केल्या आशाप्रकारच्या घटना कमी व्हायचे नाव घेत नव्हत्या. त्यामुळेच फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली आहे. दरसंचार विभागाने त्यामुळे तब्बल दोन कोटी बनावट मोबाइल क्रमांक बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे स्पूफ कॉलमध्ये ९७ टक्के घसरण झाली आहे. सरकारकडून यासाठी एख डिजिटल प्लॅटफॉर्मही तयार करण्यात आला आहे.

दूरसंचार विभागाचे ( DoT) सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी सांगितले की, संचार साथीसारख्या उपाय योजनामुळे स्पूफ कॉल 97% कमी झाले आहेत. स्पूफ कॉल म्हणजे, कॉल करणारा व्यक्ती ओळख लपवण्यासाठी कॉलर आयडीवर चुकीची माहिती देतात. त्यामुळे फोन दुसऱ्या लोकशन आणि व्यक्तीच्या नावाने आल्यासारखे वाटतं. स्कॅमर्स आशाप्रकारे लोकांना गंडा घालतात. आशाप्रकारचे कॉल कमी झाले आहेत, त्यामुळे फसवणूक करण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे.

नवीन डिजिटल प्लेटफॉर्म

ईटी टेलीकॉमच्या रिपोर्टनुसार, नीरज मित्तल यांनी सांगितले की, संचार साथीसारख्या उपाय योजनामुळे स्पूफ कॉलमध्ये 97 टक्क्यांची कपात झाली. स्पूफ कॉल जवळपास संपल्यात जमा झाल्याचेही आपण म्हणू शकतो. DoT ने एक डिजिटल इंटेलिजेंस प्लेटफॉर्म तयार केला आहे. त्या प्लॅटफॉर्मकडून फसवणुकीची माहिती तात्काळ मिळते.

AI चा वापर केला अन् 78 लाख बनावट कनेक्शन बंद -

एआयच्या मदतीने आतापर्यंत ७८ लाख बनावट मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. DoT खासगी कंपन्यांच्या मदतीने वेगवेगळ्या सेक्टरची सुरक्षा वाढवण्यासाठी काम करत आहे. आर्थिक धोका तात्काळ समजण्यासाठी खास इंडिकेटरही सुरू करण्यात आले आहे. या इंडिकेटरमुळे फसवणुकीसाठी वापरत असलेल्या मोबाई क्रमांचा पर्दाफाश होतो. DoT इंटरनेट मॉनिटरिंग सिस्टम अधिक मजबूत करण्यासाठी काम करत आहे. इंटरनेटवर होणाऱ्या चुकीच्या घटनेवर नजर ठेवण्यासाठी सिस्टमला आणखी मजबूत करण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

Thusrday Horoscope : विजयादशमी असली तरी आयुष्यात अडचणी येणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात संकटे

KamaltaI Gawai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवईंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT