Google Office Saam tv
देश विदेश

Google News : Google इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; रातोरात कमी केले ४०० हून अधिक कर्मचारी

गूगल कंपनीने तब्बल ४५३ कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

Ruchika Jadhav

Google News : सध्या संपूर्ण जगात मंदी पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच फेसबुक, ट्विटर अशा काही बड्या कंपन्यांनी आपले कर्मचारी कपात केले. आर्थिक मंदीचा फटका या बड्या कंपन्यांना देखील बसत आहे. त्यामुळे त्यांनी आपले कर्मचारी कपात केलेत. अशात आता Google ने देखील आपले कर्मचारी कमी केले आहेत. गूगल कंपनीने तब्बल ४५३ कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. (Latest Google India News)

रात्री उशिरा दिली नोटीस

गूगल कर्मचाऱ्यांना गुरुवारी रात्री उशिरा एक नोटीस देऊन या बाबत माहिती देण्यात आली. गूगलने रात्रीचं ४५३ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे एक मेल करत त्यांना ही माहिती देण्यात आली. गूगलचे वॉइस प्रेसिडेंट संजय गुप्ता यांच्या मार्फत हा मेल पाठवण्यात आला आहे. बिजनेस टुडे या वृ्त्त संस्थेने ही माहिती दिली आहे.

गूगलची सिस्टर कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या सहमतीनेच कर्मचारी कपात करण्यात आलेत, असं देखील मेलमध्ये म्हटलं आहे. सुंदर पिचाई यांनी हा निर्णय त्यांच्यावर घेतला आहे. त्यांनी कंपनीच्या दृष्टीने योग्यच निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

२०२३ च्या सुरुवातीला गूगल कंपनीने अमेरिकेतील काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. त्यानंतर त्यांनी काढलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी योग्य ते सहकार्य केलं जाईल असं म्हटलं होतं. आता फ्रेब्रुवारीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा भारतातील कर्मचारी कपात केले आहेत.

अल्फाबेट या कंपनीने देखील काही दिवसांपूरर्वीच १२,००० कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता कमी झालेले ४५३ हे त्यापैकीच आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निलेश घायवळ प्रकरणात २ बड्या राजकीय नेत्यांची नावं, रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ | VIDEO

Politics : निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का? २ मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण

Jalgaon Crime : कॉफी शॉपमध्ये पोलिसांची धाड; तरुण- तरुणी सापडले नको त्या अवस्थेत

Maharashtra Live News Update: पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिकमधील अॅप आधारित रिक्षा आणि कॅब सेवा आज बंद

बाईकच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? 99% तुम्हाला माहिती नसेल उत्तर

SCROLL FOR NEXT