Peacock Viral Video Saam Tv
देश विदेश

Peacock Viral Video: मोराची अंडी चोरायला गेल्या महिला, पण झालं असं...; व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल!

Latest Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका मोराचा व्हिडिओ (Peacock Video) तुफान व्हायरल होत आहे.

Priya More

Social Media: सोशल मीडिया (Social Media) हे असं प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी एखादा व्हिडिओ असो वा फोटो त्याची चर्चा झाल्या शिवाय राहत नाही. क्षणातच हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. यामध्ये प्राण्यांचे आणि पक्षांचे अनेक व्हिडिओ असतात. हे व्हिडिओ पाहून बऱ्याचदा आपल्याला काही तरी शिकायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एका मोराचा व्हिडिओ (Peacock Video) तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

माणसांप्रमाणेच प्राणी-पक्षी देखील आपल्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतात. आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी ते दुसऱ्यांशी देखील दोन हात करायला तयार असतात. याचीच प्रचिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मोराच्या व्हिडिओवरुन येत आहे. मोराची अंडी चोरण्यासाठी आलेल्या महिलांना या मोराने चांगलीच अद्दल घडवली आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोन महिला झाडावरुन मोराची अंडी चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. यामधील एक महिला अतिशय शिताफिने झाडावर चढून त्याठिकाणी असलेल्या घरट्यातील मोराची अंडी काढताना दिसत आहे. तर दुसरी महिला खाली उभी राहून अंडी झेलत आहे. मोराने पाहून नये यासाठी या महिला खूपच पटापट हे काम करत आहेत. अशामध्ये आचानक मोर त्याठिकाणी उडत येतो.

सुरुवातीला हा मोर झाडावर चढून घरट्यातील अंडी काढणाऱ्या महिलेवर हल्ला करतो. त्यानंतर झाडाखाली उभं राहून अंडी झेलणाऱ्या महिलेवर हल्ला करतो. या हल्ल्यात ही महिला खाली पडले. मोराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडिओला ट्विटरला आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला अनेकांनी आपल्या अकांऊटवर देखील शेअर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT