SSB Constable Recruitment 2023
SSB Constable Recruitment 2023 Saam Tv
देश विदेश

SSB Recruitment 2023: दहावी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! SSB मध्ये कॉन्स्टेबलच्या 914 पदांसाठी भरती, इतका मिळेल पगार

Priya More

Government Job: नुकताच दहावी पास (10th pass) झालेल्या आणि देशसेवेचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सशस्त्र सीमा बलामध्ये बंपर भरती (SSB Recruitment 2023) होणार आहे. या भरतीबाबत त्यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. 900 पेक्षा अधिक पदं या भरती प्रक्रियेअंतर्गत भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एसएसबीची अधिकृत वेबसाईट ssbrecit.gov.in ला भेट देऊन अर्ज करु शकतात.

एसएसबीने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत 914 रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये हेड कॉन्स्टेबलच्या विविध पदांचा समावेश आहे. या भरतीप्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.

18 जून 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मॅट्रिक / इंटरमिजिएट / आयटीआय प्रमाणपत्र / पशुवैद्यकीय पदविका आणि इतर विहित पात्रता आणि मान्यताप्राप्त मंडळ / संस्थेकडून कामाचा अनुभव असावा. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही अधिकृत अधिसूचना वाचा.

महत्वाच्या तारखा -

अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख - 18 जून 2023

पदांचा तपशील -

एकूण पदं - 914 पदं

हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) – 15 पदे

हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक - फक्त पुरुष) - 296 पदे

हेड कॉन्स्टेबल (कारभारी) - 2 पदे

हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) - 23 पदे

हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) – 578 पदे

वयोमर्यादा -

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि पदानुसार कमाल वय 25/27 वर्षे असणे आवश्यक आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

निवड प्रक्रिया -

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी / शारीरिक मानक चाचणी (PST)/ शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) / दस्ताऐवजीकरण / वैद्यकीय चाचणी यानुसार केली जाणार आहे.

पगार -

या भरती प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

अर्ज फी -

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

असा करा अर्ज -

- उमेदवारांनी सर्वप्रथम ssbrectt.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

- मुख्यपृष्ठावरील हेड कॉन्स्टेबल भरतीच्या लिंकवर क्लिक करा.

- आता अर्जावर क्लिक करा.

- उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करावी

- त्यानंतर आवश्यक तपशील प्रविष्ट करून कागदपत्रे अपलोड करा.

- त्यानंतर अर्ज फी भरा.

- त्यानंतर अर्ज सबमिट करुन तो डाऊनलोड करुन ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : आता ढिगाऱ्याखाली कोणीही नसल्याचा पालिकेचा खुलासा

Jharkhand News : ईडीची मोठी कारवाई, झारखंड सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांना अटक

Unemployment Rate : भारतात बेरोजगारी घटली, रोजगारात मोठी वाढ; सर्वेक्षणातून आकडेवारी समोर

Ghatkopar Hoarding Collapse: आरोपी भावेश भिंडेंच्या वार्षिक कमाईची माहिती आली समोर, पुणे महापालिकाही अलर्ट मोडवर

Panchganga River: पंचगंगेच्या प्रदूषणावरुन नागरिकांत संताप, महामंडळाचे दुर्लक्ष हजारो मासे मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT