Delhi Police investigation into Red Fort heist  Red Fort
देश विदेश

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Shocking heist at Delhi’s Red Fort: दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यामधील जैन धर्माच्या धार्मिक कार्यक्रमातून सोन्याचा कलश चोरीला गेला. हा कलश सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा होता. कलश ७६० ग्रॅम सोने, १५० ग्रॅम हिरे, माणिक, मोती आणि पन्ना यांनी मढवलेला होता.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • दिल्लीतील लाल किल्ल्यातून सुमारे १ कोटी किमतीचा सोन्याचा कलश चोरीला गेला.

  • ७६० ग्रॅम सोने, १५० ग्रॅम हिरे, माणिक, मोती व पन्ना यांनी कलश मढवला होता.

  • चोरीच्या वेळी जैन धर्माचा धार्मिक कार्यक्रम सुरू होता, परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही होता.

  • चोरी उघड होताच कार्यक्रम स्थळी खळबळ, पोलिसांनी सीसीटीव्ही तपास व संशयित शोध सुरू केला आहे.

  • दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासासाठी खास पथकाची नेमणूक केली आहे.

भारताची राजधानी दिल्लीमध्ये एक जबरी चोरी झाली आहे. येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यामध्ये चोरांनी तब्बल एक कोटी रूपयांच्या सोन्याच्या कलशावर हात साफ केला आहे. लाल किल्ल्यामध्ये जैन धर्माचा एक कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी चोरांनी डाव साधला. त्यांनी हिरे अन् पाचूंनू जडवलेला सोन्याचा कलश चोरला. या कलशाची किमत तब्बल एक कोटींपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, जैन धर्माच्या या कार्यक्रमासाठी दिल्ली पोलिसांचा तगडा, कडेकोट बंदोबस्त होता. सुरक्षेच्या चिंधड्या उडवत चोरांनी हिऱ्याने मढलेला सोन्याचा कलश लंपास केला आहे. या जबरी चोरीमुळे दिल्ली पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय.

राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात जैन समाजाचं एक धार्मिक अनुष्ठान सुरूये. या धार्मिक कार्यक्रमात सर्वजण मग्न असतानाच चोरांनी एक कोटींच्या कलशावर हात साफ केला. हा कलश 760 ग्रॅम सोने,150 ग्रॅम हिरे, माणिक मोती, पन्ना यांनी मढवलेला होता. त्याची बाजारातील किंमत एक कोटींच्या घरात होती. एकदम चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे चोरांनी शिताफीने कलश चोरला. काही काळ कुणाच्याही ही बाब लक्षात आली नाही. पण काही वेळानंतर कलश न दिसल्याने कार्यक्रमाच्या स्थळी एकच खळबळ उडाली.

लाल किल्ला परिसरातून कलश चोरीला गेल्याची बातमी दिल्लीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांना ही माहिती समजताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कार्यक्रम स्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांना काही व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहेत. पोलिसांकडून त्यांची ओळख पटवण्यात येत आहे. चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी खास पथकाची नेमणूक केली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT